BJ Watling Twitter
क्रीडा

गंभीर दुखापतीनंतर शेवटपर्यंत विकेटमागे थांबण्याचं धाडस!

कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या वॉटलिंगने दुखापतीनंतरही उपचार घेऊन शेवटपर्यंत खेळण्याला प्राधान्य दिले.

सुशांत जाधव

WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship) न्यूझीलंडचा विकेट किपर बॅट्समन बीजे वॉटलिंग (BJ Watling) कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. राखीव दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने थ्रो केलेल्या चेंडूमुळे वॉटलिंगच्या बोटाला लागला. गंभीर दुखापतीनंतरही तो देशासाठी शेवटपर्यंत खेळताना पाहायला मिळाले. बोटाला दुखापत झाल्यानंतर फिजिओ मैदानात आले. यावेळी उजव्या हाताचे बोटाटे हाड सरकल्याचे निदान झाले. ज्यावेळी संघाकडून टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, जेमिन्सन आणि वॅगनर यांचा भेदक मारा सुरु होता त्यावेळी वेदना बाजूला ठेवून विकेटमागे उभारण्याचे धाडस दाखवले. त्याने ही जबादारी ज्या पद्धतीने पेलली ते चक्रावून टाकणारे आहे.

कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या वॉटलिंगने दुखापतीनंतरही उपचार घेऊन शेवटपर्यंत खेळण्याला प्राधान्य दिले. वेदना सहन करत त्यांने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रविंद्र जडेजाला बाद करण्याच्या नादात त्याला दुखापत झाली होती. अखेरचा सामना असल्यामुळे बोटाला पट्टी बांधून त्याने शेवटपर्यंत खेळण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय योग्य असल्याचेही त्याने या सामन्यात दाखवून दिले. वॅगनरच्या शॉर्ट चेंडूवर त्याने रविंद्र जेडेजाचा झेल घेतल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर त्याच्या स्पिरिटचे कौतुक होत आहे.

सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने फेअरवेल सामन्यात वॉटलिंगसोबत हस्तांदोलन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचेही पाहायला मिळाले. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन विराट कोहली आणि वॉटलिंग यांच्यातील तो अवस्मरणीय क्षण शेअर केला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे जन्मलेल्या बीजे वॉलिंगने नोव्हेंबर 2009 मध्ये टी-20 मालिकेतून न्यूझीलंडकडून पदार्पण केले. वॉटलिंगने कसोटी क्रिकेटमध्ये 8 शतक आणि 19 अर्धशतके झळकावली आहेत. न्यूझीलंडकडून विकेट किपर बॅट्समनच्या रुपात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा बीजे वॉटलिंगच्या नावे आहे. मेगा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वीच त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. न्यूझीलंडच्या संघाने पहिली वहिली टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकत आपल्या सहकाऱ्याला मेगा फेअरवेलची संधी साधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video

SCROLL FOR NEXT