क्रीडा

WTC INDvsNZ : पावसासंदर्भात मोठी अपडेट

नामदेव कुंभार

ICC World Test Championship Final 2021 : पावासाच्या व्यत्ययामुळे विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचे जवळपास तीन दिवस वाया गेले आहेत. पहिला आणि चौथा दिवस पुर्णपणे पावसामुळे वाया गेला तर दुसऱ्या दिवशी 64 आणि तिसऱ्या दिवशी 76 षटकांचा खेळ झाला. कोसोटीचा निकाल उर्वरित दोन दिवसांवर आहे. पण या दोन्ही दिवशी साउदम्टनमधील वातावरण कसं असेल ? हा प्रश्न क्रीडा चाहत्यांना भेडसावत आहे. मात्र, साउदम्टनमधून आनंदाची बातमी आली आहे. मंगळवारी साउदम्टनमध्ये पावसाचा अंदाज नाही. दिवसभर सुर्यप्रकाश असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

उर्वरित दोन दिवसांत प्रत्येकी 98 षटकांप्रमाणे जास्तित जास्त 196 षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकांत कसोटी निकाली न ठरल्यास भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद देण्यात येणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आयसीसी आणखी एका राखीव दिवसाचा विचार करत आहे. याबाबत आयसीसीकडून कोणतेही आधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पाचव्या आणि सहाव्या दिवशी वातावारण ढगाळ राहिल. हलक्या स्वरुपाच्या पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, दोन्ही दिवशी खेळ पूर्ण होऊ शकतो, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. चौथ्या दिवशीच्या तुलनेत पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाऊस कोसळणार नाही. दिवसभर वातावरण ढगाळ राहिल. मंगळवार आणि बुधवारी पर्ण दिवस खेळ होण्याची शक्यता असली, तरी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सोमवारी साउदम्टनमध्ये कोसळलेल्या तुफानी पावसामुळे मैदान ओलं झालं आहे. त्यामुळे मंगळवारी सामना सुरु झाला तरिही चेंडू सहजतेने सीमापार जाणार नाही. फलंदाजांना धावांसाठी कष्ट घ्यावे लागणार आहे. गोलंदाजांना पोषक वातावरणात भारतीय संघ कसा फायदा घेतोय पाहूयात....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT