BCCI 
क्रीडा

IDFC फर्स्टनं मारली बाजी! BCCI च्या सामन्यांच्या टायटल स्पॉन्सरशिपचे मिळवले हक्क

बीसीसीआयनं नुकतीच याची घोषणा केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक सामन्यांसाठीच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क IDFC First बँकेनं जिंकले आहेत. बीसीसीआयनं नुकतीच याची घोषणा केली. यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत IDFC फर्स्ट बँक लिमिटेडनं यशस्वी बोली लावली आणि जिंकली. (IDFC First acquires title sponsorship rights for all BCCI international and domestic home matches)

'या' सामन्यांसाठी असेल टायटल स्पॉन्सर

आयडीएफसी फर्स्ट आता भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय सामने (महिला आणि पुरुष दोन्ही), BCCI द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी सारख्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 वर्षांखालील) सामन्यांसाठी टायटल स्पॉन्सर असेल.

इंडिया-ऑस्ट्रेलिया मालिकेद्वारे होणार सुरुवात

यामागे आयडीएफसी फर्स्टचा देशभरातील आणि बाहेरील क्रिकेटप्रेमींशी संपर्क वाढवणे हा उद्देश आहे. या सहभागातून BCCI आणि IDFC फर्स्ट क्रिकेटच्या चाहत्यांना सामन्यांचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी प्रयत्न करतील. पुढील महिन्यात सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह या नव्या टायटल स्पॉन्सरशिपची सुरुवात होईल.

चाहत्यांना फायदा होईल - बिन्नी

बीसीसीआय आणि आयडीएफसीच्या या नव्या सहकाऱ्याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “आम्हाला बीसीसीआयच्या सर्व सामन्यांसाठी आयडीएफसी फर्स्टचा टायटल स्पॉन्सर म्हणून स्वागत करताना आनंद होत आहे. त्यांची वचनबद्धता आणि दृष्टीकोन हा क्रिकेटच्या भावनेला अनुसरून आहे त्यामुळं आम्ही एका यशस्वी सहकार्याची अपेक्षा करतो. ज्यामुळं खेळाचा आणि त्याच्या चाहत्यांचा फायदा होईल"

क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरु - जय शाह

“आयडीएफसी फर्स्टमुळं बीसीसीआयच्या सामन्यांमध्ये नवा अध्याय सुरू होईल. आम्हाला एक चांगला भागीदार सापडला असून ज्याला आमच्याप्रमाणं नाविन्यता आवडते. टायटल प्रायोजक म्हणून त्यांच्या पाठिंब्यानं आम्ही या महान खेळात उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी सज्ज आहोत,” असं बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह यांनी म्हटलं आहे.

बँकेला जागतीक दर्जा वाढणार - IDFC Bank

तर IDFC First बँकेचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर मधिवानन बालकृष्णन म्हणाले, “पुढील ३ वर्षांसाठी भारतात खेळल्या जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आणि सर्व देशांतर्गत स्पर्धांचे टायटल स्पॉन्सर बनताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी आयडीएफसी फर्स्ट बँकेला जागतीक दर्जाची बँक तयार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT