Novak Djokovic Salman Butt esakal
क्रीडा

Novak Djokovic : जोकोविच पाकिस्तानचा असता तर... माजी क्रिकेटपटू हे काय बोलून गेला

अनिरुद्ध संकपाळ

Novak Djokovic Salman Butt : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपले 10 वे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. त्याने स्टेफेनोस त्सित्सिपासचा सरळ सेटमध्ये पराभव करत विक्रमी 22 वे ग्रँडस्लॅम जिंकले. 35 वर्षाच्या नोव्हाक जोकोविचने आता सर्वाधिक 22 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

दरम्यान, नोव्हाक जोकोविचने 22 वे ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर पाकिस्तानचा माजी फलंदाज सलमान बट्टने आपल्या यूट्यूब चॅनलवरून चांगलेच अकलेचे तारे तोडले. जोकोविजच्या आडाने सलमानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला.

आपल्य यूट्यूब चॅनवल बोलताना बट्ट म्हणाला की, 'तो टेनिस खेळतोय हे बरं आहे. जर तो पाकिस्तानात असता तर त्याला 30 वर्षाच्या पुढे क्रिकेट खेळू शकला नसता. जरी त्याने त्रिशतक ठोकलं असतं तरी तो खेळू शकला नसता.'

निवृत्त झालेला सलमान बट्ट पुढे म्हणाला की, 'असा हा आमचा जुना सेटअप आहे. ते कशा प्रकारचे लोक आहे हे कळत नाही. ते वयाची पन्नाशी पार केली तरी खेळू शकतात. मात्र आम्हाला सांगतात की तुम्ही वयाची तिशी पार केल्यानंतर खेळू शकत नाही.'

नोव्हाक जोकोविचने एटीपी रँकिंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. 35 वर्षाच्या नोव्हाक जोकोविचने स्पेनच्या कार्लोस अलकराझला अव्वल स्थानावरून खाली खेचले. तो दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला मुकला होता. तो आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. जोकोविच जुलै 2011 पासून 374 व्या आठवड्यात क्रमांक 1 वर पोहचला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT