Ms Dhoni 
क्रीडा

'धोनी शिवाय सीएसकेची कल्पना करा'; रैनाची पोस्ट व्हायरल

रैनावर अनसोल्डचा शिक्का बसल्यापासून चेन्नई आणि त्याच्या नात्यात फुट पडल्याची चर्चो

धनश्री ओतारी

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि सुरेश रैनाचे नातं सर्वश्रुत आहे. सीएसकेचे चाहते धोनीला थाला नावाने हाक मारतात कर रैनाला 'चिन्न थाला'. मात्र, रैनावर अनसोल्डचा शिक्का बसल्यापासून चेन्नई आणि त्याच्या नात्यात फुट पडल्याची चर्चो जोरदार रंगली आहे. आयपीएल खेळत नसल्याने रैना सध्या कमेंट्री बॉक्समध्ये दिसत आहे. अशातच त्याच एक कमेंट सध्या चर्चेत आली आहे. 'कल्पना करा की धोनी सीएकेमध्ये नाही' अशी त्याची एका पोस्टला कमेंट पडली आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यातील चर्चेला उधाण आलं आहे.

आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनीने रविचंद्र जडेजाला सीएसके संघाची कमान दिली होती. पण त्यानी एक दोन सामन्यानंतर धोनीला परत दिली. तेव्हापासून धोनीजी ही आयपीएल शेवटची असल्याचे तर्क चाहते लावत आहेत. दरम्यान सीएसकेने धोनीसंदर्भात इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ज्यावर सुरेश रैनाने दिलेली प्रतिक्रिया व्हायकल होताना दिसत आहे.

धोनीचा फोटो शेअर सीएसकेने खास कॅप्शन दिली आहे. जेव्हा धोनी मैदानात उतरतो तेव्हा संपुर्ण स्टेडीअम धोनीच्या नावाने जय जयकार करत असते. यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही. असे सीएसकेने म्हटले आहे. या विशेष पोस्टला रैनानेदेखील कमेंट केली आहे.

'धोनीशिवाय सीएसके संघाची कल्पना करा' अशी कमेंट रैनाने केली आहे. त्याचा नेमका हेतु काय होत हे अद्याप कळलेल नाही. धोनीशिवाय सीएकेची कल्पना करनं हे चाहत्यांसाठी खुप पर्वणीचे आहे. पण रैनाची ही कमेंट पाहून सीएसके आणि रैना यांच्यातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. सध्या त्याची ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

ms dhoni

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 4 किताब पटकावले आहेत. धोनीने ऑगस्ट 2020मध्ये इंटरनॅशनल क्रिकेला अलविदा केलं. आणि त्याच दिवशी रैनानेदेखील निवृत्तीची घोषणा केली.

सुरेश रैनावर अनसोल्डचा शिक्का

चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) आपली 12 वर्षे देणाऱ्या सुरेश रैनावर (Suresh Raina) यंदाच्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Auction) अनसोल्डचा शिक्का बसला. सीएसकेने घरवापसी मोहिमेतून रैनाला वगळले.

त्यावेळी सीएसकेच्या सीईओने सुरेश रैनाला खरेदी केले नाही याची अपराधी भावना आमच्या मनात आहेच. रैनाचे संघात नसणे निराशाजनक आहे. तो गेल्या 12 वर्षापासून संघासोबत आहे. मात्र तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की, तो आमच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये बसत नव्हता. असे कारण स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT