क्रीडा

Olympic : सुवर्णपदक विजेत्याला हरवणाऱ्या अतनु दासचा पराभव, भारताचं पदकाचं स्वप्न भंगलं

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमधुन भारतासाठी एक निराशाजनक बातमी आहे.

दीनानाथ परब

टोक्यो: टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत तिरंदाजीमधुन (archery event) भारतासाठी एक निराशाजनक बातमी आहे. अतनु दासचा (Atanu Das) प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला आहे. अतनुच्या पराभवामुळे भारताचे पदकाचे स्वप्न भंगले (india medal hope) आहे. या पराभवामुळे अतनु दासचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. जपानच्या ताकाहारु फुरुकावाने अतनु दासचा पराभव केला. (In Tokyo Olympics Atanu Das exited the mens individual archery event in dmp82)

शूट ऑफ फेरीत या सामन्याचा निकाल लागला. दोन दिवसांपूर्वी अतनुने दक्षिण कोरियाचा अव्वल तिरंदाज जीन येकचा पराभव केला होता. ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदक मिळवणाऱ्या जीनला टोक्योमध्ये सुद्धा विजयासाठी पसंती देण्यात आली होती. पण अतनुने त्याचा पराभव केला.

इतक्या अव्वल तिरंदाजाचा पराभव केल्यामुळे अतनुकडून पदकाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण आज अतनुला ती लय टिकवता आली नाही. अतनु दासचा पहिल्या सेटमध्ये पराभव झाला. त्याने या सेटमध्ये २५ इतका स्कोर केला, तर ताकाहारु फुरुकावाने २७ स्कोर केला. या सेटमध्ये दोन्ही तिरंदाजांना थेट १० गुणांवर नेम साधता आला नाही. दुसऱ्या सेटमध्ये दोघांची गुणसंख्या बरोबरीत २८-२८ इतकी राहिली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये शूट आऊटमधून निकाल लागला.

बॉक्सिंगमध्येही निराशा

बॉक्सिंगमधुनही निराश करणारी बातमी आहे. अमित पंघलचा प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. ५२ किलो वजनीगटात कोलंबियाच्या युबेर्जेन रिवासने अमितचा पराभव केला. अमितने हा सामना १-४ ने गमावला. अमित पंघलने पहिली फेरी जिंकली. पण त्यानंतर युबेर्जेनने जोरदार पुनरागमन करत अमितला संधीच दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT