Ind vs Pak Asia Cup 
क्रीडा

Ind vs Pak Asia Cup: राजवर्धननंतर सुदर्शनने उडवली झोप, भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानला पाजले पराभवाचे पाणी

Kiran Mahanavar

India vs Pakistan Emerging Asia Cup : यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इमर्जिंग आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 206 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने 36.4 षटकांत यशस्वीपणे गाठले आणि 8 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताचा हिरो ठरलेल्या साई सुदर्शनने अप्रतिम शतकी खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाने हा सामना 8 विकेटने जिंकला

पाकिस्तानने दिलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. 12व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेकला मुबस्सीर खानने बोल्ड केले. अभिषेक 20 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, साई सुदर्शन दुसर टोक धरून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.

साई सुदर्शनने 110 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 3 षटकार दिसले. त्याचबरोबर निकिन जोसने 64 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली आहे. कर्णधार यश धुलने 21 (19) धावा करून नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.

पाकिस्तानचा संघ 205 धावांवर ऑलआऊट

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही. कासिम अक्रमने 48 धावांची खेळी खेळली, जी पाकिस्तान संघाकडून खेळलेली सर्वात मोठी खेळी होती. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 48 षटकात 205 धावांवर गारद झाला.

यादरम्यान भारतीय गोलंदाज आरएस हेंगसरकरने मोठ्या सामन्यात 5 विकेट घेतल्या, तर मानव सुथारने 3 विकेट घेतल्या. याशिवाय रियान पराग आणि निशांत सिंधूने 1-1 बळी त्यांच्या खात्यात नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT