Jemima Rodrigues sakal
क्रीडा

Jemima Rodrigues : पाकविरुद्धच्या विजयासाठी कोहलीकडून प्रेरणा

निर्णायक खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सकडून विराटला श्रेय

सकाळ वृत्तसेवा

केपटाऊन : भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्‍वकरंडकाची सुरुवात शानदार केली. मुंबईकर खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स हिने नाबाद ५३ धावांची खेळी साकारत या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या या विजयाचे व खेळीचे श्रेय जेमिमा हिने विराट कोहलीला दिले. विश्वकरंडक स्पर्धेत पाकविरुद्ध विराटच्या प्रेरणादायी खेळीमुळे मलाही शक्य झाले, असे याप्रसंगी ती म्हणाली.

भारत - पाकिस्तान यांच्यामधील लढती नेहमीच विशेष असतात. या दोन देशांच्या लढती बघतच मी लहानाची मोठी झाली. या लढतीआधी आमच्या बैठकीत याबाबत चर्चाही झाली. विराट कोहलीची मेलबर्न येथील खेळीबाबतही बोलणे झाले. आम्हाला या स्पर्धेची सुरुवात चांगली करायची होती. त्यानुसार खेळ करायचा ठरवण्यात आले, असे जेमिमा पुढे सांगते.

हरमनप्रीतकडून कौतुक

जेमिमा रॉड्रिग्स व रिचा घोष यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करीत भारताला पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवून दिला. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने दोघींच्या फलंदाजीचे कौतुक केले. हरमनप्रीत म्हणाली, पाकिस्तानी संघाने चांगली फलंदाजी केली. पण आम्हाला विजय हवाच होता.

जेमिमा व रिचा या दोघींनी शानदार फलंदाजी करीत विजय खेचून आणला, असे ती पुढे सांगते. भारत - पाकिस्तान ही लढत नेहमीच स्पेशल असते. या लढतीला क्रिकेटप्रेमींचाही दणदणीत प्रतिसाद लाभतो. या लढतीत विजय साकारला आहे.

पण पुढील लढतीसाठी आम्हाला सज्ज व्हावे लागणार आहे. काही बाबींमध्ये सुधारणा करावी लागेल, असे हरमनप्रीत स्पष्ट करते. दरम्यान, भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यासह भारतीय पुरुष संघाच्या माजी खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.

नेमके काय घडले…

पुरुषांचा टी-२० विश्‍वकरंडक २०२२मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आला. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये २३ ऑक्टोबरला मेलबर्न येथे लढत पार पडली. या लढतीत पाकिस्तानकडून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ४ बाद ३१ धावा अशी झाली असताना विराट कोहलीने ५३ चेंडूंमध्ये नाबाद ८२ धावांची खेळी करीत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवून दिला. जेमिमाने विराटच्या या खेळीचे कौतुक करीत आपल्यालाही प्रेरणा मिळाल्याचे आवर्जून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे गट, काँग्रेस आणि भाजप आमनेसामने! मतदार कुणाकडे झुकणार? वाचा BMC निवडणुकीत अंधेरी पश्चिमचे समीकरण

Who Is Vishal Jaiswal : एक गुगली अन् विराट स्टंप आऊट! कोहलीसह Rishabh Pant ला शतकापासून रोखणारा विशाल जैस्वाल नेमका कोण?

Vijay Hazare Trophy : भारतीय संघात परतला अन् Rinku Singh सूसाट सुटला... १५ चेंडूंत ६८ धावांसह ठोकले वादळी शतक

Vijay Hazare Trophy: पृथ्वी शॉ आक्रमक मूडमध्ये... वादळी खेळीसह महाराष्ट्राच्या विजय पक्का केला, ऋतुराज गायकवाडही बरसला

Latest Marathi News Live Update : रांजणगाव एमआयडीसी गोडाऊन चोरीचा गुन्हा 72 तासांत उघड; 68 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT