India Vs Afghanistan T20I Series News Mohali Weather Forecast marathi news 
क्रीडा

Ind vs Afg : भारत - अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना होणार रद्द? पाऊस नाही तर हा आहे मोठा धोका

India Vs Afghanistan T20I Series News Mohali Weather Forecast |

Kiran Mahanavar

Ind vs Afg T20I Series News Mohali Weather Forecast : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका आजपासून सुरू होत आहे. 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज पंजाबच्या मोहाली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

टी-20 क्रिकेटसाठी तमाम क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. कारण या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माही बऱ्याच दिवसांनी टी-20 खेळताना दिसणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार्‍या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याला पावसाचा धोका नसून थंडीचा मोठा धोका आहे. मोहालीमध्ये सध्या प्रचंड थंडी आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यावर दव आणि धुक्याचा जबरदस्त परिणाम होऊ शकतो.

पहिल्या टी-20 सामन्याआधी मोहालीच्या हवामानाची बरीच चर्चा आहे. जानेवारी महिन्यात थंडी, दव आणि धुक्याचा प्रभाव मोहालीत अनेकदा दिसून येतो. आज, गुरुवारी सामन्याच्या दिवशी मोहालीमध्ये किमान तापमान 5-6 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सूर्यास्तानंतर प्रचंड दव पडणार आहे. त्यामुळे सामन्यात धुके एक मोठी समस्या असू शकते.

मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) स्टेडियमवर जानेवारीच्या हिवाळ्यात डे-नाईट टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. उत्तर भारतात सध्या धुक्यासह थंडीची लाट असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोहाली येथे होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात भारत आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंना थंडीचा सामना करावा लागणार आहे. दव असल्याने गोलंदाजांना चेंडूवर पकड घेणे कठीण होणार आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (पीसीए) मुख्य क्युरेटर राकेश कुमार म्हणाले, 'पीसीए हिवाळ्यात देशांतर्गत सामने आयोजित करत आहे, परंतु ते दिवसा आयोजित केले जातात. सुदैवाने गेल्या दोन-तीन दिवसांत धुके कमी झाले आहे. दव दूर ठेवण्यासाठी आजपासून आम्ही मैदानात रसायनाचा वापर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT