IND vs AFG 2nd T20I virat kohli fan breaches security-at-holkar-stadium-police-detained cricket news in marathi  sakal
क्रीडा

Ind vs Afg : विराट कोहलीची सुरक्षा 'राम भरोसे', पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह? इंदूरच्या स्टेडियममध्ये चाहत्याची घुसखोरी

India Vs Afghanistan T20I Series News |

Kiran Mahanavar

India vs Afghanistan 2nd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात भारताच्या विजयापेक्षा विराट कोहलीच्या एका चाहत्याचीच चर्चा होत आहे.

विराट कोहलीची क्रेझ जगभरात इतकी पसरली आहे की, प्रत्येकाला त्याची एक झलक पाहिची असते. आणि जेव्हा जेव्हा चाहत्यांना संधी मिळते तेव्हा ते त्याला भेटण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो.

अशा परिस्थितीत काही चाहते सुरक्षा कवच मोडत विराटला भेटण्यासाठी मैदानात उतरतात. इंदूरच्या होलेकर स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान अशीच घटना घडली.

इंदूरच्या पोलिस प्रशासनाला चकवा देत एका चाहत्याने विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात थेट मैदानात एन्ट्री मारली. पण आता या सुरक्षा कवचवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या चाहत्यांने सुरक्षेचा भंग केला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंला भेटण्यासाठी सुरक्षेचा भंग करत मैदानात घुसले आहेत. भारत-अफगाणिस्तान दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यानही होळकर स्टेडियमच्या मैदानात क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीजवळ एका तरुणाने जाऊन त्याला मिठी मारली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीच्या या चाहत्याला मैदानातून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, युवकाकडे सामन्याचे तिकीट असून तो नरेंद्र हिरवाणी गेटमधून होळकर स्टेडियममध्ये दाखल झाला. तो तरुण कोहलीचा मोठा चाहता आहे आणि तो कोहलीला भेटण्याच्या इच्छेने प्रेक्षक गॅलरीच्या कुंपणावर चढून मैदानात आला. तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत असून चौकशीच्या आधारे याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT