Shreyas Iyer India Vs Afghanistan T20I Series marathi news esakal
क्रीडा

Ind vs Afg : उपकर्णधाराला संघातून बाहेर केल्यानंतर भारताचा माजी दिग्गज संतापला! BCCI समोर ठेवले 3 प्रश्न

India Vs Afghanistan T20I Series News |

Kiran Mahanavar

India Vs Afghanistan T20I Series : अफगाणिस्तानविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहली वर्षभरानंतर संघात परतले, पण या संघातून अनेक मोठी नावे वगळण्यात आली. संघ निवडीबाबत अनेक दिग्गज खेळाडूंनी आक्षेप व्यक्त केला आहे. यामध्ये भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राच्या नावाचाही समावेश आहे.

बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्ध जाहीर केलेल्या संघात श्रेयस अय्यर, इशान किशन आणि केएल राहुलला दुर्लक्षित करण्यात आले आहे. म्हणजेच त्यांना संघात स्थान मिळालेले नाही. त्याचवेळी शिवम दुबेचे संघात पुनरागमन झाले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला बीसीसीआयचा हा निर्णय आवडला नाही. त्याने बीसीसीआयच्या निवड समितीसमोर तीन प्रश्न ठेवले.

खरंतर, बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यानंतर आकाश चोप्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरला उपकर्णधार बनवण्यात आले होते आणि त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निवड झाली नाही. आता अफगाणिस्तानविरुद्धही त्याला संघात स्थान मिळाले नाही?

शिवम दुबेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत संघात स्थान मिळाले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाबाहेर होता आणि त्याने अफगाणिस्तानविरुद्ध पुनरागमन केले आहे?

याशिवाय आकाश चोप्राने इशान किशनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आकाश चोप्राने विचारले की इशान किशन कुठे आहे? त्यांच्या उपलब्धतेबद्दल काही बातम्या?

केएल राहुल किंवा श्रेयस अय्यर हे दोघेही अफगाणिस्तान मालिकेसाठी निवडलेल्या संघात नाहीत. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या संघात नाहीत. तसेच, सिराज, बुमराह आणि शमी हे त्रिकूट देखील या संघाचा भाग नाही. इशान किशनबद्दल बातमी अशी आहे की, त्याने स्वतः ब्रेक घेतला आहे. इशान आणि राहुल यांच्या अनुपस्थितीत जितेश शर्मा आणि संजू सॅमसन हे यष्टिरक्षक फलंदाज म्हणून या संघात आहेत.

अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघाची निवड - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT