India vs Afghanistan T20 Series India Squad cricket marathi news 
क्रीडा

Ind vs Afg T20 Team India Squad : टीम इंडियाची घोषणा! रोहित शर्मा झाला कर्णधार, विराटचेही पुनरागमन; जाणून घ्या संपूर्ण संघ

Team India T20 Squad Against Afghanistan News | अफगाणिस्तान विरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

Kiran Mahanavar

Team India T20 Squad Against Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच विराट कोहलीही संघाचा भाग असणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या उपांत्य फेरीत खेळल्यानंतर आतापर्यंत संघासाठी एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण आता हे दोन्ही खेळाडू टी-20 संघात परतले आहेत. त्याचबरोबर शिवम दुबे, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), गिल, जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ - इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला T20- 11 जानेवारी- मोहाली

  • दुसरा T20- 14 जानेवारी- इंदूर

  • तिसरा T20- 17 जानेवारी- बेंगळुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT