India Vs Afghanistan T20I series Marathi News sakal
क्रीडा

Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका कधी, कुठे खेळली जाणार अन् 'फ्री' मध्ये कुठे पाहता येणार?

India Vs Afghanistan T20I series |

Kiran Mahanavar

India Vs Afghanistan T20I series : टीम इंडियाला 2024 मधील पहिली होम सीरिज अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची आहे. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका असेल. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत दुसरा इंदूरमध्ये आणि तिसरा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. क्रिकेट चाहत्यांनाही या मालिकेचा फ्री आनंद घेता येणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (11 जानेवारी) मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन IS बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुसरा टी-20 सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी मालिकेतील शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने येतील.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका मोफत कशी पाहायची?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिन्ही टी-20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता खेळवले जातील. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर केले जाईल. त्याच वेळी टी20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल जे चाहते विनामूल्य पाहू शकतात. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ - इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT