ind vs aus 1st odi playing-11 hardik pandya captain ishan kishan-will-open-with-shubman-gill and KL Rahul out  sakal
क्रीडा

IND vs AUS Playing 11: गिलसह ईशान किशन करणार ओपनिंग! कॅप्टन हार्दिक केएल राहुलला देणार डच्चू?

Team India News: हिटमॅनची जागा घेणार ईशान किशन; पण केएल राहुलच काय?

Kiran Mahanavar

India vs Australia 1st ODI Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपताच आता वनडे मालिका खेळल्या जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना उद्या खेळल्या जाणार आहे. 

श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार नाहीत, कारण हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. तर रोहित शर्माही पहिल्या वनडेत खेळणार नाही. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. मग पहिल्या वनडेत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल पाहू.

  • कौटुंबिक कार्यक्रमामुळे रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नाही. त्याच्या जागी हार्दिक संघाची धुरा सांभाळणार आहे.

  • इशान किशनला संधी मिळण्याची खात्री, श्रेयसच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवलाही संधी मिळू शकते.

  • रोहित शर्मा खेळणार नाही म्हणजे गिलसह ईशान किशन करणार ओपनिंग करतील.

  • गिलसह ईशान किशन ओपनिंग करणार मग कॅप्टन हार्दिक केएल राहुलला डच्चू देणार का?

या वर्षाच्या अखेरीस 2023 च्या विश्वचषकाची तयारी करत असताना टीम इंडिया 17 मार्च रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळून 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये परतेल.

अशा स्थितीत या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाशी कसोटी मालिकेप्रमाणे टक्कर देण्यासाठी सज्ज असेल.

पहिल्या वनडेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सर्वांच्या नजरा हार्दिककडे असणार आहे. हार्दिक हा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध झाले आहे कारण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत एकही टी-20 मालिका गमावलेली नाही.

रोहितच्या अनुपस्थितीत, इशान किशनला संधी मिळण्याची खात्री आहे, जो शुभमन गिलसोबत सलामीसाठी मैदानात उतरू शकतो. किशनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये द्विशतक झळकावून सिद्ध केले होते.

विराट कोहलीने या वर्षाच्या सुरुवातीला वनडे शतकाचा दुष्काळ संपवला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम कसोटीत तो अव्वल फॉर्ममध्ये दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT