ind vs aus 1st tet match kuldeep yadav not in playing-11 
क्रीडा

IND vs AUS: भारतीय प्लेइंग-11 मधून पुन्हा कुलदीपचा पत्ता कट; रोहित शर्मावर पक्षपाताचा आरोप

Kiran Mahanavar

Ind vs Aus 1st Test Match Kuldeep Yadav : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी आजपासून नागपूरमध्ये सुरू झाली आहे. जिथे टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे, तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करत आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीनंतर रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन सांगितली आणि त्याच्यात कुलदीप यादवची निवड न केल्यामुळे भारतीय चाहते खूप नाराज झाले.

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा थोडा निराश दिसला, पण त्याने संघाला छोट्या धावसंख्येवर रोखण्याचे बोलून संघाची घोषणा केली. दोन खेळाडूनी संघात पदार्पण केले, ज्यात सूर्या आणि भरत यांचा समावेश आहे, पण फॉर्मात असलेल्या कुलदीप यादवला संघात स्थान न मिळाल्याने भारतीय चाहते चांगलेच संतापले होते. कुलदीपला संघात न घेतल्याने त्याने सोशल मीडियावर बीसीसीआय आणि कर्णधाराला खूप ट्रोल केले आहे.

कुलदीप यादवने भारतासाठी केवळ 8 कसोटी सामने खेळले आहेत, गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सामनावीर ठरल्यानंतरही केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व असताना कुलदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. कुलदीपला संघासाठी जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चेंडूसोबतच कुलदीपने फलंदाजीतही उत्कृष्ट योगदान दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT