India vs Australia Test Series sakal
क्रीडा

IND vs AUS: खेळपट्टीबाबत ऑस्ट्रेलियन मीडियाच्या प्रश्नाला रोहितचे चोख उत्तर; म्हणाला...

कर्णधार रोहित शर्माने नागपूरच्या खेळपट्टीवर म्हणाला; 'उद्या जे 22 खेळाडू खेळतील...'

Kiran Mahanavar

India vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद घेतली.

यादरम्यान ऑस्ट्रेलियन मीडियाने रोहितला खेळपट्टीबद्दल प्रश्न विचारला. रोहित शर्माने त्यांना चोख उत्तर दिले जे आता व्हायरल होत आहे. नागपुरातील खेळपट्टीवरून गोंधळ सुरूच आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत दोघेही आतापर्यंत खेळपट्टीवर विशेष आनंदी दिसले नाहीत. आता खेळपट्टी कोणते रंग दाखवेल हे सामन्यातच कळेल.

ऑस्ट्रेलियन मीडियाने नागपूरच्या खेळपट्टीबाबत प्रश्न केला असता रोहित शर्माने उत्तर दिले की, 'आम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. उद्या जे 22 खेळाडू खेळतील, ते सर्व दर्जेदार क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना चांगले क्रिकेट खेळावे लागेल.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित हे दोघेही नागपूरच्या खेळपट्टीवर फारसे प्रभावित नसल्याच्या बातम्या आल्या आहेत. दोघांनीही त्यात बदल करण्याची मागणी केली. याशिवाय पत्रकार परिषदेत रोहितने आपल्या चार फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले.

रोहित पुढे म्हणाला की, आमचे चारही फिरकीपटू दर्जेदार फिरकीपटू आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी एकत्र भरपूर क्रिकेट खेळले आहे, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांनीही जेव्हा संधी मिळाली तेव्हा चांगली कामगिरी केली आहे. ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या अंतिम फेरीच्या तिकीटसाठी भारतीय संघ कोणतीही कसर सोडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS : दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईत जुबेरकडून सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : 'स्वाभिमानी'ने रोखली 'वारणा'ची ऊस वाहतूक; दोन दिवसांत दर न जाहीर केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

'तरुण मुलांपेक्षा म्हातारेच जास्त....' ट्विंकल खन्नाचं बोल्ड स्टेटमेंट चर्चेत, म्हणाली...'त्यांची खूप प्रॅक्टिस झाल्यानं ते...'

Zubair Hungergekar: साेलापुरातील जुबेरच्या शाळेतील भाषणाचे ‘एटीएस’ने मागितले व्हिडिओ; तीन दिवस विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची होणार पडताळणी

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे पुन्हा केले कौतुक, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याचे दिले संकेत

SCROLL FOR NEXT