ind vs aus 2nd-odi-match-mitchell-starc-bowling-speed Team India top order out rohit sharma shubman gill
ind vs aus 2nd-odi-match-mitchell-starc-bowling-speed Team India top order out rohit sharma shubman gill  
क्रीडा

IND vs AUS 2nd ODI: आऊट, आऊट अन् आऊट… स्टार्कसमोर दिग्गज भारतीय खेळाडूंनी टेकले गुडघे

Kiran Mahanavar

Ind Vs Aus 2nd ODI Mitchell Starc : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणम येथे एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस पडला, पण खेळ वेळेवर सुरू झाला. पण यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी धुमाकूळ घातला, भारतीय संघ पूर्णपणे हतबल झाला. मिचेल स्टार्कच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय संघ पत्त्यासारखा कोसळला आणि टीम इंडियाची धावसंख्या 5 गडी बाद 49 अशी झाली.

विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी रोहित शर्मा संघात पुनरागमन करत असल्याने येथे मोठी धावसंख्या पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण पहिल्याच षटकापासूनच मिचेल स्टार्कने असा पराक्रम केला की टीम इंडियाला पुनरागमन करणे कठीण झाले.

शुभमन गिल पहिल्याच षटकात बाद झाला, त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही पाचव्या षटकात झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव त्याच्या पुढच्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला, ही सलग दुसरी वेळ आहे जेव्हा सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवरच बाद झाला. सीन अॅबॉटने हार्दिक पांड्याची विकेट घेतली.

केएल राहुल आणि हार्दिक पांड्याही फार काही करू शकले नाहीत आणि भारताचा निम्मा संघ 9.2 षटकांत 49 धावांत बाद झाला. यादरम्यान मिचेल स्टार्क 140 आणि 145 किमी प्रति तासाच्या वेगाने चेंडू फेकत होता.

मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तो सध्या वनडे क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचा एकदिवसीय विक्रम पाहता त्याने आतापर्यंत 109 एकदिवसीय सामन्यांमध्ये 218 विकेट घेतल्या आहेत, त्याची सरासरी 21.79 आहे जी अधिक चांगली मानली जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT