IND vs AUS 3rd ODI esakal
क्रीडा

IND vs AUS 3rd ODI : तिसऱ्या वनडेत स्थानिक खेळाडू, सपोर्ट स्टाफही खेळणार; काय म्हणतोय रोहित शर्मा?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 3rd ODI : भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन वनडे सामन्यातील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे. मालिका 2 - 0 अशी खिशात टाकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघातील दिग्गज खेळाडू संघात परतले आहेत. मात्र या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने आपला संघ फक्त 13 खेळाडूंचाच ठेवला आहे. त्यामुळे जर गरज लागली तर राजकोटमधील स्थानिक खेळाडूंना मैदानावर उतरावं लागले का अशी शक्यता निर्माण झाली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना हा एक औपचारिकताच राहिली आहे. भारतीय संघाने तरी हा सामना एक औपचारिकताच म्हणून पाहिला आहे. म्हणूनच आपला संघ 13 खेळाडूंवर आणून ठेवला आहे. जर या सामन्यात काही खेळाडूंना दुखापत झाली तर रोहित शर्माला स्थानिक खेळाडूंचा सहारा घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

पहिल्या दोन सामन्यात विश्रांती घेणारा रोहित शर्मा तिसऱ्या वनडे सामन्यासाठी संघात परतला आहे. त्याने सामन्यापूर्वीच्या पत्रकारपरिषदेत तिसऱ्या वनडेसाठी भारताचा संघ 13 खेळाडूंचा असेल असे सांगितले.

तो म्हणाला, 'आमचे बरेच खेळाडू हे आजारी पडले आहेत. ते उपलब्ध राहू शकत नाहीत. काही खेळाडू वैयक्तिक कारणामुळे घरी गेले आहेत. काहींना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आमच्याकडे फक्त 13 खेळाडूंच आहेत.'

नेट बॉलर नाही

भारतीय संघाला सरावावेळी त्यांच्या मुख्य गोलंदाजांवरच अवलंबून रहावे लागले. कारण संघातील सर्व अतिरिक्त खेळाडू हे रिलीज करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जर गरज लागलीच तर बदली क्षेत्ररक्षक म्हणून सपोर्ट स्टाफ किंवा स्थानिक खेळाडूंवर अवलंबून रहावं लागले. अशी परिस्थिती जर दोनपेक्षा जास्त खेळाडू दुखापग्रस्त झाले तर उद्भवू शकते.

मुकेश कुमारबाबतही अनिश्चितता

बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला जसप्रीत बुमराहच्या जागी बोलवण्यात आलं होतं. मात्र एशियन गेम्ससाठी भारतीय संघ मंगळवारी चीनला रवाना होणार आहे. मुकेश देखील त्या संघाचा भाग आहे.

रोहित म्हणाला की, 'संघातील अनेक खेळाडू आजारी आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला संघात खूप अनिश्चितता आहे. काही गोष्टी आमच्या हातात नाहीत.'

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT