Ishan Kishan Video  sakal
क्रीडा

Ind vs Aus : ईशानची 'ही' चूक भारतीय संघाला पडली महागात! ऑस्ट्रेलियाला मिळाले इतक्या फुकट धावा; पहा व्हिडिओ

Kiran Mahanavar

Ishan Kishan Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे, त्यातील तिसरा सामना मंगळवारी (28 नोव्हेंबर) गुवाहाटी येथे खेळला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान संघाचा अतिशय रोमांचक सामन्यात 5 विकेट्सने पराभव केला. येथे वेड आणि मॅक्सवेल जोडीने शेवटच्या दोन षटकात 45 धावा केल्या, यादरम्यान इशान किशननेही गोलंदाजांच्या खराब कामगिरीपेक्षा विकेटच्या मागे खूप वाईट कामगिरी केली.

खरंतर, ऑस्ट्रेलियाच्या डावात भरपूर दव होते. त्यामुळे गोलंदाजांच्या हातातून चेंडू निसटत होता. १९ वे षटक टाकायला आलेल्या अक्षर पटेलने 3 चेंडूत 10 धावा दिल्या होत्या, चौथ्या चेंडू डॉट टाखला. आता भारतीय संघासाठी सर्व काही ठीक होईल असे वाटत होते, परंतु अचानक इशान किशनने विकेट मागून अपील केले.

भारतीय संघाच्या भल्यासाठी त्याने हे केले, पण घडले उलटेच. अंपायरने इशानच्या स्टंपिंगचा रिव्ह्यू पाहिला ज्यानंतर त्याला कळले की फलंदाज नाबाद आहे, पण ईशानने मोठी चूक केली, त्याने स्टंपिंगच्या पुढे चेंडू पकडला. त्यामुळे तो चेंडू नो बॉल दिला. म्हणजे आता पुढचा चेंडू फ्री हिट होता. मॅथ्यू वेडने नो बॉलचा पुरेपूर फायदा घेत पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकला.

अशा स्थितीत ईशानच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलियाच्या सात धावा गेल्या. मात्र, इशानच्या चुकांची मालिका इथेच संपली नाही आणि त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेंडू पकडण्यात हलगर्जीपणा दाखवला आणि पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला बायच्या रूपाने चार धावा मिळाल्या.

यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 19व्या षटकात पाहुण्या संघाला पूर्णपणे खेळात आणले. आणि त्यानंतर 20व्या षटकातही मॅक्सवेलने चौकार आणि षटकार खेचून संघाला सहज विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT