IND vs AUS 3rd Test Day 1 Shubman Gill replaces KL Rahul as IND opt to bat in Indore Score Updates cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS 3rd Test : इंदूर कसोटीतुन केएल राहुल बाहेर! संघात दोन बदल, या दिग्गज खेळाडूची एंट्री

इंदूर कसोटीत ही आहे भारताची प्लेइंग-11

Kiran Mahanavar

India Playing 11 vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जात आहे. टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच, हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग-11 मध्ये कर्णधाराने दोन बदल केले आहेत. केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांना वगळण्यात आले आहे. राहुलच्या जागी शुभमन गिल आणि शमीच्या जागी उमेश यादवला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद भूषवत असलेल्या स्टीव्ह स्मिथनेही प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत.

ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा समावेश करण्यात आला आहे. स्टार्क याआधी दोन्ही कसोटीतून बाहेर होता. त्याचवेळी अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचेही पुनरागमन करत आहे. सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर कोपरच्या फ्रॅक्चरमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT