ind vs aus 3rd test KL Rahul removal as India vice-captain Rohit Sharma first reaction to selectors' big call  
क्रीडा

IND vs AUS: 'राहुलकडून उपकर्णधारपद काढून घेण्याचा अर्थ काय...' कर्णधार रोहित स्पष्टच बोलला

Kiran Mahanavar

India vs Australia 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या इंदूर कसोटीपूर्वी केएल राहुल चर्चेचा विषय राहिला. खराब फॉर्ममधून जात असलेल्या राहुलला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळणार की नाही हा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.

केएल राहुलला शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपकर्णधार पदावरून हटवण्यात आल्यामुळे त्याला स्थान मिळण्याची शक्यताही कमी झाली आहे. सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार रोहित शर्माने केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्याचे कारण सांगितले आहे.

केएल राहुलला पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. पण राहुलला बॅटने काही चमत्कार दाखवता आला नाही. यानंतर निवड समितीने त्याला संघात ठेवले, मात्र उपकर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले. यावर रोहित शर्माने मौन सोडले आणि म्हणाला की, केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात काही अर्थ नाही. या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये.

केएल राहुलला वाईट काळात कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे रोहित शर्माच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसत होता. मात्र प्लेइंग-11 मध्ये केएल राहुलच्या जागेवर सातत्याने प्रश्न उठत आहे. सराव सत्रादरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविडने शुभमन गिलसोबत बराच वेळ घालवला आहे. अशा स्थितीत शानदार फॉर्मात असलेला गिल तिसऱ्या कसोटीत राहुलची जागा घेऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.

केएल राहुलनंतर संघाला कोणताही नवीन उपकर्णधार मिळालेला नाही. बीसीसीआयने संघ जाहीर करताना कोणालाही उपकर्णधार बनवले नाही. कर्णधार रोहित शर्माकडे उपकर्णधार नियुक्तीचे अधिकार असतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पुजारा, अश्विन आणि जडेजा हे उपकर्णधारपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. तिसऱ्या कसोटीत या तिघांपैकी एक उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT