ind vs aus 3rd-test-match-indore Not KL Rahul ks-bharat-may-dropped Captain Rohit Sharma cricket news in marathi  
क्रीडा

IND vs AUS: KL राहुल नाही तर हा खेळाडू बनला रोहितसाठी डोकेदुखी! तिसऱ्या कसोटीतून देणार डच्चू

Kiran Mahanavar

IND vs AUS, 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्चपासून इंदूर येथे तिसरा कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियासाठी एक खेळाडू ही सर्वात मोठी समस्या झाला आहे. केएल राहुल नाही, तर टीम इंडियाच्या एक नव्या खेळाडूला वगळले जाऊ शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये फ्लॉप कामगिरीमुळे या खेळाडूने आता कर्णधार रोहित शर्माचा विश्वास गमावला आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूला 1 मार्चपासून इंदूरमध्ये कांगारूंविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणे शक्य होणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून विकेटकीपर फलंदाज केएस भरतला वगळून इशान किशनला संधी देऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएस भरत बॅटने फ्लॉप ठरला आहे. वास्तविक केएस भरत नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्यांच्या टर्निंग खेळपट्ट्यांवर विकेटकीपिंग दरम्यान संघर्ष करताना दिसला.

ऋषभ पंत किंवा इशान किशन एका सत्रात सामन्याचा रंग बदलू शकतात, पण केएस भरतच्या फलंदाजीमध्ये कोणताही एक्स-फॅक्टर दिसत नाही. केएस भरत ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो, तिथे टीम इंडियाला एका स्फोटक फलंदाजाची उणीव भासत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये केएस भरतला फलंदाजीत केवळ 8, 6 आणि नाबाद 23 धावा करता आल्या आहेत. मात्र टीम इंडियाला केएस भरतकडून आक्रमक यष्टीरक्षक फलंदाजाची गरज आहे.

इशान किशनचा बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी यष्टीरक्षक म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर संघाला खालच्या मधल्या फळीत एका स्फोटक फलंदाजाची गरज होती. यामुळे इशान किशनचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र पहिल्या 2 सामन्यात इशान किशनला खेळण्याची संधी मिळाली नाही. तिसऱ्या कसोटीसाठी संघ व्यवस्थापन इशान किशनला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आजमावू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT