ind vs aus 3rd test-r ashwin-overtook-kapil-dev-record-most-international-wickets-indore  
क्रीडा

IND vs AUS: कसोटी क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विनची दहशत! दिग्गज खेळाडूला मागे टाकत रचला मोठा इतिहास

Kiran Mahanavar

Ind vs Aus 3rd Test R Ashwin : भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा खतरनाक ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारताचा महान क्रिकेटर कपिल देव यांचा 'महारीकॉर्ड' उद्ध्वस्त केला आहे.

टीम इंडियाचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात 3 विकेट घेतल्या, यासह माजी भारतीय कर्णधार कपिल देवचा 687 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा विक्रम मोडला आहे. सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे.

अनिल कुंबळेने भारताकडून सर्वाधिक 956 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग. ज्याने 711 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात 3 विकेट घेत रविचंद्रन अश्विनने भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढल्यानंतर तो भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

रविचंद्रन अश्विनच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 689 विकेट्स आहेत. कपिल देव यांनी भारतासाठी 687 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज

  • 1. अनिल कुंबळे - 956 विकेट्स

  • 2. हरभजन सिंग - 711 विकेट्स

  • 3. रविचंद्रन अश्विन - 689 विकेट्स

  • 4. कपिल देव - 687 विकेट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT