ind vs aus-4th-test-axar patel-third-half-century 
क्रीडा

IND vs AUS : बापू मस्त छे! षटकार चौकारचा पाऊस, कांगारूविरुद्ध झळकावले तिसरे अर्धशतक

अक्षर पटेलने चालू मालिकेतील झळकावले तिसरे अर्धशतक

Kiran Mahanavar

Ind vs Aus 4th Test Axar Patel : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबाद येथे खेळल्या जात आहे. त्याचवेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 10 गडी गमावून 480 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 571 धावा केल्या आणि 91 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3/0 आहे. भारताकडे अजूनही 88 धावांची आघाडी आहे. यादरम्यान केएस भरतनंतर अक्षर पटेलच्या फलंदाजीतून सर्वोत्तम कामगिरी दिसून आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना अक्षर पटेलने अर्धशतक झळकावले. 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षरचे या मालिकेतील हे तिसरे अर्धशतक आहे. त्याने 113 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. अक्षरने नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 84 तर दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत 74 धावा केल्या.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी एका मालिकेत सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत अक्षर सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करत संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी MS धोनीने 2008 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 7 व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना तीन पन्नास अधिक धावा केल्या होत्या.

भारताला 393 धावांच्या एकूण धावसंख्येवर श्रीकर भरतच्या रूपाने पाचवा धक्का बसला. यानंतर फलंदाजीला आलेल्या अक्षरने विराट कोहलीसोबत या सामन्यात षटकार चौकारचा पाऊस पाडत भारतासाठी 162 धावांची सर्वात मोठी भागीदारी केली.

भारताच्या कसोटी इतिहासात पहिल्या सहा विकेटसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रेयस अय्यर अनफिट असल्यामुळे फलंदाजीसाठी आला नाही, त्यामुळे अक्षर पटेलला सातव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT