India vs Australia 4th Test Day 5 Live Cricket Score  sakal
क्रीडा

IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना ड्रॉ! मालिका 2-1ने टीम इंडियाच्या खिशात

Kiran Mahanavar

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 158/2

अहमदाबाद कसोटीत पाचव्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 158/2 आहे. मार्नस लबुशेन अर्धशतक झळकावत आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ त्याला साथ देत आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा 67 धावांनी पुढे आहे.

ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली

153 धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली. ट्रॅव्हिस हेड 163 चेंडूत 90 धावा काढून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला क्लीन बोल्ड केले.

शेवटच्या षटकात न्यूझीलंडचा विजय! टीम इंडियाचं WTC Final तिकीट पक्कं

अहमदाबाद कसोटीशिवाय टीम इंडियासाठी क्राइस्टचर्चमधून आनंदाची बातमी आली आहे. न्यूझीलंडने एका रोमहर्षक कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला असून यासह श्रीलंका विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 8 धावांची गरज होती, जी त्यांनी शेवटच्या चेंडूवर जाऊन पूर्ण केली.

पहिल्या सत्राचा खेळ संपला

अहमदाबाद कसोटीचे पहिले सत्र संपले आहे. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 1 बाद 73 धावा केल्या आहेत. मार्नस लबुशेन 22 आणि ट्रॅव्हिस हेड 45 धावा करत खेळत आहे. सामन्याचे दोन सत्र बाकी असताना भारताकडे अजूनही 18 धावांची आघाडी आहे. अशा स्थितीत हा सामना अनिर्णित राहणे जवळपास निश्चित आहे.

श्रीलंका-न्यूझीलंड सामना झाला रंजक, टीम इंडियाचे WTC तिकीट कन्फर्म?

शेवटच्या दिवशी श्रीलंकेने न्यूझीलंडला 285 धावांचे लक्ष्य दिले होते. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने 3 विकेट गमावल्या असून त्यांची धावसंख्या 200 च्या पुढे आहे. म्हणजेच शेवटच्या 10 षटकांत न्यूझीलंडला विजयासाठी 71 धावांची गरज आहे. त्याचबरोबर श्रीलंकेला इतिहास रचण्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे.

भारतासाठी निकाल किती महत्त्वाचा ?

  • जर न्यूझीलंडने हा सामना ड्रॉ केला किंवा जिंकला तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल.

  • जर क्राइस्टचर्चचा सामना अनिर्णित राहिला आणि अहमदाबादचा सामनाही अनिर्णित राहिला, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचेल.

  • जर श्रीलंकेला अंतिम फेरी गाठायची असेल, तर त्याला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल. जे श्रीलंकेसाठी खूप कठीण असू शकते.

कसोटीच्या शेवटच्या दिवशी अश्विनची जादू! अर्ध्या तासाच्या आत कांगारूला पहिला धक्का

कसोटीच्या शेवटच्या दिवशी अश्विनची जादू दिसुन येत आहे. रविचंद्रन अश्विनने अर्ध्या तासाच्या आत कांगारूला पहिला धक्का दिला आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट १४ धावांवर पडली. अश्विनने मॅथ्यू कुहनमनला विकेट्ससमोर पायचीत करून भारताला पहिली यश मिळवून दिली आहे. कुहनमनने 35 चेंडूत सहा धावा केल्या.

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू 

अहमदाबादमध्ये पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू कुहनमन ही जोडी क्रीजवर आहे.

India vs Australia 4th Test Day 5 Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळल्या जात आहे. सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, प्रत्युत्तर म्हणून भारताने 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 172 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाच्या 180 आणि कॅमेरून ग्रीनच्या 114 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिलच्या 128, विराट कोहलीच्या 186 आणि अक्षर पटेलच्या 79 धावांच्या जोरावर 571 धावा केल्या. नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 91 धावांची आघाडी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT