ind-vs-aus-4th-test-former-coach-ravi-shastri-statement-on-team-india-turning-point ahmedabad  
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाचा पराभव निश्चित! माजी कोचच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात उडाली खळबळ

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia 4th Test : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळल्या जात आहे. गुरुवारी या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत होती. आता एका दिग्गजाच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात दोन दिवसांचा खेळ झाला आहे. पहिल्या डावाच्या आधारे भारत सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा 444 धावांनी मागे आहे. खेळाचे तीन दिवस बाकी आहेत, पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सामन्याबाबत वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने पहिल्या डावात सर्वाधिक 180 धावा केल्या. त्याने 422 चेंडूंचा सामना करत 21 चौकार मारले. कॅमेरून ग्रीनने 170 चेंडूंत 18 चौकारांच्या मदतीने 114 धावा जोडल्या. या दोन शतकवीरांमुळे ऑस्ट्रेलियाने 167.2 षटकांत 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

दरम्यान, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक वक्तव्य केले आहे. समालोचन करताना तो म्हणाला, 'मला वाटते की भारतीय संघाची एक योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नवीन चेंडू घेणे योग्य नव्हते कारण उमेश 35 वर्षांचा आहे, त्याने खूप गोलंदाजी केली तो थकला होता.

शास्त्री पुढे म्हणाले, 'माझ्या मते भारताची योजना लवकरात लवकर नवीन चेंडू मिळवण्याची होती, जेणेकरून ऑस्ट्रेलिया सामन्यापासून दूर जाईल. ग्रीन आणि ख्वाजा यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्याने शुक्रवारी सकाळच्या सत्रात भारताला एकही विकेट मिळवता आला नाही. रोहित शर्मासाठी कर्णधार म्हणून ही मोठी परीक्षा होती कारण त्याला पहिल्यांदाच फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी मिळाली आहे.

भारताकडून या सामन्यात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने 6 विकेट घेतल्या. त्याने 47.2 षटकात 91 धावा दिल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 1.90 होता. त्याचवेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2 बळी घेतले. त्याचवेळी अष्टपैलू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT