KL Rahul sakal
क्रीडा

KL Rahul : राहुलची फटकेबाजी पाहताचा अथिया्च्या प्रेमाचं टेंपरेचर वाढलं

केएल राहुलवर गर्लफ्रेंड अथिया शेट्टीने केला प्रेमाचा वर्षाव

Kiran Mahanavar

KL Rahul : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. 200 हून अधिक धावा करूनही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाला भारतीय गोलंदाज आणि खराब क्षेत्ररक्षण जबाबदार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20I सामन्यात KL राहुलने अर्धशतक झळकावले. टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलच्या या कामगिरीवर त्यांची गर्लफ्रेंड खूप खूश झाली. तिने राहुलचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची लव्हस्टोरी कोणापासूनही लपलेली नाही. ही जोडी नेहमीच चर्चेत असते. पहिल्या सामन्यात त्याने शानदार खेळी केली, या आनंदात अथिया शेट्टीने राहुलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये केएल राहुल जाताना दिसत आहे. त्याचा हा फोटो शेअर करताना त्याने हार्ट इमोजी शेअर केला आहे. या सामन्यात राहुलने केवळ 35 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. डावाच्या 12व्या षटकात केएल राहुलला जोश हेझलवूडने बाद केले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 71 धावा, तर केएल राहुलने 55 आणि सूर्यकुमार यादवने 46 धावा केल्या. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 19.2 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने 61 आणि मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT