australia t20 captain Aaron Finch Announces Retirement 
क्रीडा

IND vs AUS : संघ भारताच्या दौऱ्यावर, ऑस्ट्रेलियाच्या बड्या खेळाडूने घेतली निवृत्ती

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका सुरू होणार आहे. पण त्याआधीच ऑस्ट्रेलीया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा टी-20 कर्णधार आरोन फिंचने निवृत्ती जाहीर केली आहे.

सध्या ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आहे. येथे चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियन टीम भारतात असताना, त्यांच्या कॅप्टनने निवृत्तीची घोषणा केली आहे.

संघाचा सलामीवीर आणि तुफानी फलंदाज फिंचने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. अॅरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाचे सर्व फॉरमॅटमध्ये 254 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले, त्यात पाच कसोटी, 146 एकदिवसीय आणि 103 टी-20 सामने खेळले आहेत.

यावेळी फिंच म्हणाला, मी 2024 च्या पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत खेळणार नाही, हे लक्षात घेऊन, पद सोडण्याची आणि त्या स्पर्धेसाठी संघाला वेळ देण्याची हीच योग्य वेळ आहे.

याशिवाय, तो म्हणाला की, माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्या चाहत्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचेही मी खूप आभार मानू इच्छितो. 2021 मध्ये दुबई येथे फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला T20 विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने वनडे कर्णधारपदाची निवृत्ती जाहीर केली होती

फिंच हा टी-20 फॉरमॅट क्रिकेटचा स्टार खेळाडू होता आणि त्याला 2020 मध्ये ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द डिकेड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने 2018 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध फक्त 76 चेंडूत 172 धावा करून T20I मधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला, ज्यामध्ये 10 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. याशिवाय 2013 मध्ये साऊथम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध 63 चेंडूत 156 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT