ind vs aus rohit-sharma-will-be-attending-his-brother-in-laws-marriage-during-1st-odi-against-australia  
क्रीडा

IND vs AUS: कर्णधार रोहित पहिला वनडे सामना का नाही खेळणार; समोर आले मोठे कारण

Kiran Mahanavar

India vs Australia 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. तीन वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईत होणार आहे पण रोहित शर्मा त्यात खेळणार नाही. टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर असल्याची बातमी आधीच आली होती. पण तो का खेळणार नाही याचे कारण आता समोर आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी त्याच्या जागी हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत कर्णधारपद भूषवणार आहे. मात्र त्यावेळी या निर्णयामागील कारण सांगण्यात आले नव्हते.

सोशल मीडियावर रोहित शर्मा पहिल्या एकदिवसीय सामन्यात न खेळण्यामागील कारणानुसार, तो आपल्या भावाच्या लग्नाला जाणार आहे. त्यामुळे तो पहिल्या वनडे सामना खेळणार नाही.

रोहित शर्माने अलीकडेच श्रेयस अय्यरसह त्याचा सहकारी शार्दुल ठाकूरच्या लग्नात हजेरी लावली होती. शार्दुलच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर मालिकेतील चौथी आणि शेवटची कसोटी खेळण्यासाठी तो अहमदाबादला गेला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father Kills Son : सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने घातला दगड; सततच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य, कासेगाव पोलिसांत गुन्‍हा

Hingoli News: तहानलेल्या वानरांसाठी पाण्याची सोय; हयातनगर येथील शेतकरी विजय पाटील यांचा पुढाकार

Beed News: पोस्ट ऑफिस आहे की जनरल स्टोअर?; पत्रे दुकानात अन् कर्मचारी सुस्त; नागरिक संतप्त, सेवेेचा लाभ मिळणार तरी कसा?

Beed News: ‘सीतेच्या न्हाणी’चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT