IND vs AUS David Warner Not Playing India vs Australia 1st ODI Check ind and AUS Playing 11 cricket news-in-marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दिग्गज सलामीवीर पहिल्या ODI सामन्यातून बाहेर

Kiran Mahanavar

IND vs AUS 1st ODI Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला ODI खेळला जात आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण याआधी कांगारूं संघाला मोठा धक्का बसला आहे. डेव्हिड वॉर्नर पहिल्या एकदिवसीय सामन्यातुन बाहेर गेला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वरिष्ठ खेळाडू डेव्हिड वॉर्नर पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. यामुळे तो या सामन्यात खेळत नसून मिचेल मार्श डावाची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी आजारपणामुळे मायदेशी परतला आहे. त्यांच्या जागी जोश इंग्लिस यांचा समावेश करण्यात आला आहे.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दिल्लीत दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. मोहम्मद सिराजच्या बॅक टू बॅक बाउन्सर बॉलमुळे दुखापती झाला होता. तिसऱ्या चौथ्या कसोटीत खेळला नाही आणि मायदेशात परतला होता.

भारताची प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन - ट्रेस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ , ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, जॉन इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT