Ind vs Aus World Cup Final 2023  
क्रीडा

IND vs AUS Final: भारत अजूनही जिंकू शकतो... फक्त 'या' गोष्टींची काळजी घ्यावी लागेल

या तीन गोष्टी सांभाळल्या तर भारताला अजूनही जिंकण्याची संधी...

रोहित कणसे

जगभरातील प्रत्येक क्रिकेट चाहता आयसीसी वनडे विश्वचषक फायनलची वाट पाहत होता. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हा बदला घेण्याची संधी म्हणून पाहिलं जात होतं. तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत.भारताला या सामन्यात म्हणावी अशी धावसंख्या उभी करता आलेली नाही. मात्र आता भारताला या सामन्यात कमबॅक करायचा असेल तर काही बाबी लक्षात घेणे महत्वाचे आहे.

विजयासाठी काय करणे आवश्यक?

आता इथून सामना आपल्या बाजून फिरवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना जे कांगारूनी करून दाखवलं तेच करून दाखवावे लागणार आहे. त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय गोलंदाजांना पहिल्या २० षटकात ऑस्ट्रेलियाच्या किमान तीन विकेट्स घेणे आवश्यक आहे. यासोबत सामन्यात भारतीय संघासाठी फिल्डींग हा महत्वाचा फॅक्टर ठरणार असं दिसतंय. भारतीय संधाने चांगली फिल्डींग करत किमान २० धावा वाचवणे आवश्यक आहे. यासोबत मैदानावर पॉझिटीव्ह बॉडी लॅग्वेज ठेवणे देखील महत्वाचे आहे. पराभूत मानसिकता बाळगल्यास भारतीय संघ वेळेच्या आधीच सामना गमावू शकतो

ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् भारतीय संघ २४० धावांत ऑलआऊट झाला. कांगारू संघापुढे भारताने विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

विजयासाठी काय करणे आवश्यक?

आता इथून सामना आपल्या बाजून फिरवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना जे कांगारूनी करून दाखवलं तेच करून दाखवावे लागणार आहे. त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल बोलायचे झाले

1. भारतासाठी पहिली १० षटके महत्वाची

भारतीय गोलंदाजांना पहिल्या १० षटकात ऑस्ट्रेलियाच्या किमान तीन विकेट्स घेणे आवश्यक आहे.

2. फिल्डिंगमध्ये ३० ते ४० धावा वाचवणं

यासोबत सामन्यात भारतीय संघासाठी फिल्डींग हा महत्वाचा फॅक्टर ठरणार असं दिसतंय. भारतीय संधाने चांगली फिल्डींग करत किमान २० धावा वाचवणे आवश्यक आहे.

3. सकारात्मक खेळ

यासोबत मैदानावर पॉझिटीव्ह बॉडी लॅग्वेज ठेवणे देखील महत्वाचे आहे. पराभूत मानसिकता बाळगल्यास भारतीय संघ वेळेच्या आधीच सामना गमावू शकतो

नरेंद्र मोदी स्टेडियमचं रेकॉर्ड काय सांगतं?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आजवर खेळल्या गेलेल्या ३० वनडे सामन्यात पहिल्यांचा फलदाजी करणारा संघ १५ वेळा तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ १५ वेळा विजयी

ठरला आहे. पहिल्यांदा खेळणार संघ सरासरी २४३ धावा करण्यात यशस्वी झाला तर पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वोत्तम धावसंख्या ३६५ इतकी आहे. पाठलाग करताना सर्वाधिक ३२५ धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करण्यात आला आहे. तर पहिल्यांदा खेळताना विजयी धावसंख्येची सरासरी २५३ इतकी आहे.

कोणी किती धावा केल्या?

भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८, कुलदीप यादवने १० धावा केल्या.

तर रवींद्र जडेजा ९, मोहम्मद शमी ६, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Latest Marathi Breaking News : धक्कादायक! 16 वर्षीय भाचीला सख्या मामानं चालत्या लोकलमधून खाली ढकललं

SCROLL FOR NEXT