ind vs aus odi David Warner Plays Cricket With Locals On Mumbai Street Ahead Of ODIs Against India  cricket news in marathi kgm00
ind vs aus odi David Warner Plays Cricket With Locals On Mumbai Street Ahead Of ODIs Against India cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS : 'संघात घेत नाही म्हणून...' डेव्हिड वॉर्नर उतरला मुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळायला

Kiran Mahanavar

IND vs AUS ODI David Warner : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅट्समन डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबईतील मुलांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहे.

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो एका गल्लीत काही मुलांसोबत क्रिकेट खेळत आहे. या व्हिडिओतील सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे वॉर्नर येथेही फिरकी गोलंदाजीविरुद्ध सराव करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने बॉलिंग करणाऱ्या मुलाला रस्त्यावर बनवलेल्या गटाराच्या कव्हरवर चेंडू मारण्यास सांगितले जेणेकरून चेंडूला टर्न घेता येईल. वॉर्नरला यांचा कितपत फायदा झाला असेल, हे फक्त त्यालाच ठाऊक.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज नुकताच कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत मोहम्मद शमीने एकदा बाऊन्सरने कोपर मारला आणि नंतर त्याच्या डोक्यावर, त्यामुळे तो मालिकेतून बाहेर पडला आणि ऑस्ट्रेलियाला परतला. वॉर्नरसाठी ही मालिका चांगली राहिली नाही आणि त्याला 3 डावात केवळ 26 धावा करता आल्या.

आता एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला आहे. यादरम्यान चाहत्यांनी सुद्धा डेव्हिड वॉर्नरची चांगलीच खेचली. एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले की, संघात घेत नाही म्हणून डेव्हिड वॉर्नर उतरला मुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT