ind vs aus-pat cummins-david warner ruled-out-from 3rd-test match How Australia will select the playing11 cricket news kgm00 ेोकोत
क्रीडा

IND vs AUS: तिसर्‍या कसोटीतून 4 खेळाडू बाहेर! संघासाठी Playing-11 निवडणे कठीण

दिल्ली कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला....

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia 3rd Test Playing-11 : भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्चपासून इंदूर कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. उभय संघांमधील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसर्‍या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत.

त्यामुळे कांगारू संघावर आता पराभवाचे सावट आहे. इंदूर कसोटी हरताच ऑस्ट्रेलियन संघ मालिका गमावेल. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अॅश्टन एगर, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल स्वीपसन तिसऱ्या सामन्यातून बाहेर आहेत. लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ आणि टॉड मर्फी यांनाही तिसर्‍या कसोटीतून वगळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कांगारू संघावर पराभवाचे सावट आहे.

  • दिल्ली कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतला. चौथ्या कसोटीसाठी तो पुनरागमन करू शकतो. कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाची धुरा सांभाळत आहे.

  • स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या डाव्या कोपराला दुखापत झाली आहे. वॉर्नरच्या जागी ट्रॅव्हिस हेड सलामी करताना दिसणार आहे.

  • वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड खराब फिटनेसमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अॅश्टन एगर आणि मिचेल स्वेप्सन यांना गेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात ठेवण्यात आलेले नाही.

  • लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ आणि टॉड मर्फी यांनाही तिसऱ्या कसोटीतून बाहेर जाण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT