ind vs aus shreyas iyer-ruled-out 
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! हा दिग्गज खेळाडू दुसऱ्या कसोटीतून तर बुमराह ODI मधून बाहेर

बुमराह ODI मधून बाहेर! IPL मध्ये मुंबई इंडियन्सचे करणार प्रतिनिधीत्व....

सकाळ ऑनलाईन टीम

दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे पुनरागमन लांबणीवर पडणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुमरा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरीत कसोटींसाठी तसेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात नसणार आहे.

बीसीसीआय व भारतीय संघ व्यवस्थापन यांच्या वतीने बुमराच्या तंदुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. या वर्षी दोन महत्त्वाच्या मालिका आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना व एकदिवसीय विश्‍वकरंडक या दोन अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तो तंदुरुस्त असावा यासाठी बुमराला झटपट खेळवण्याचा निर्णय घेण्यात येत नाही आहे. मात्र तो आगामी आयपीएलच्या मोसमात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करील याची दाट शक्यता आहे.

श्रेयस अय्यर घेतोय दुखापतीवर उपचार

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार घेत आहे. याबाबतचे फोटोही त्याने सोशल माध्यमावर प्रसिद्ध केले. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसरा कसोटी सामना नवी दिल्ली येथे शुक्रवारपासून सुरु होणार आहे. या कसोटीसाठी अय्यर तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही. तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळे स्थानिक क्रिकेट स्पर्धेसाठीही त्याची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजाप्रमाणे त्यालाही स्थानिक क्रिकेट खेळावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : महाराष्ट्र हादरला ! काँग्रेस नेत्याकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, बेडरुममध्ये नेऊन अंगावर पेट्रोल ओतले अन्...

शोध सावित्रीबाई आणि जोतीबांच्या पाऊल खुणाचा

CM Yogi Adityanath: बिहारच्या रिंगणात ‘बुलडोझर बाबां’चा प्रचार; योगी आदित्यनाथांच्या दोन डझन सभा, ‘महाआघाडी’वर जोरदार प्रहार

Latest Marathi Breaking News : आजपासून नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम

Kishori Girls: पुणे ग्रामीण-अहिल्यानगरमध्ये जेतेपदाची लढत रंगणार; राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी

SCROLL FOR NEXT