Suryakumar Yadav 
क्रीडा

Suryakumar Yadav : मुंबईच्या रस्त्यावर सूर्याची बॅट तळपली! गल्लीतला 360चा व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार रस्त्यावरील क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईचा आहे, जिथे सूर्यकुमार फिरायला गेला होता आणि चाहत्यांसोबत स्ट्रीट क्रिकेटही खेळला होता. यादरम्यान त्याने चाहत्यांच्या सांगण्यावरून सुप्ला शॉटही खेळला.

सूर्यकुमार यादव सध्या भारताच्या कसोटी संघाचा एक भाग आहे. नागपुरातील पहिल्या कसोटीत त्याला खेळण्याची संधी मिळाली. मात्र पदार्पणाच्या सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. यानंतर श्रेयस अय्यर फिट झाला आणि सूर्यकुमारला संघ सोडावा लागला. तेव्हापासून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबाद येथे होणार असून या सामन्यातही सूर्यकुमारला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र सूर्यकुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. यानंतर तो आयपीएलमध्ये आपले कर्तृत्व दाखवेल.

सूर्यकुमार यादव आयपीएलमधील मुंबई संघाचा भाग आहे. केवळ मुंबईसाठी शानदार फलंदाजी केल्यानंतर त्याने भारताच्या टी-20 संघात स्थान मिळवले आणि आता तो जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-20 फलंदाज आहे. टी-20 मध्ये अप्रतिम फलंदाजी करूनच त्याने भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघात स्थान मिळवले आहे. मात्र तो एकदिवसीय आणि कसोटीमध्ये टी-20 सारखी आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही.

48 टी-20 सामन्यांमध्ये 1675 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवने 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ 953 धावा केल्या आहेत. त्याचवेळी एकमेव कसोटी सामन्यात त्याच्या बॅटमधून आठ धावा आल्या. सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 108 डावात 2644 धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: गुन्ह्यांचं शतक करायचं होतं, पण ५०० रुपयांच्या नोटेनं खेळ बिघडवला, तरुणाला तुरुंगवास घडवला, काय घडलं?

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT