क्रीडा

IND vs AUS Test : दाखवायचे दात वेगळे... त्यापेक्षा सराव सामना नको

गतवेळेस कसोटीपूर्वी हिरवीगार मात्र सामन्यांसाठी होत्या वेगळ्याच खेळपट्ट्या!

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia Test 2023 : आगामी भारत दौऱ्यात कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना नसल्याबद्दल टीका करण्यात येत आहे, परंतु या घटनेकडे ऑस्ट्रेलियाचा हुकमी फलंदाज स्टीव स्मिथ वेगळ्याच दृष्टिकोनातून पहात आहे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे यापेक्षा सराव सामना नसलेला पत्करला असे सुचित करणारे मत त्याने व्यक्त केले.

सराव सामना असता आणि त्यासाठी पाटा खेळपट्टी दिली असती प्रत्यक्ष सामन्यात मात्र वेगळी असती त्यापेक्षा सराव सामना नसल्याने काही फरक पडणार नाही, असे स्मिथ म्हणाला. कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना न खेळण्याचे धोरण ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान दौऱ्यापासून सुरू केले आहे. भारत दौरा ऑस्ट्रेलियासाठी सर्वार्थाने महत्त्वाचा असला तरी हेच धोरण त्यांनी कायम ठेवले आहे.

प्रत्यक्ष सामन्यांसाठी कशा खेळपट्या मिळणार आहेत हे पहावे लागेल. पण मालिकेपूर्वी सराव सामना न खेळणे हे योग्यच आहे. गतवेळच्या दौऱ्यात भारतीयांकडून आम्हाला सराव सामन्यासाठी हिरवीगार खेळपट्टी देण्यात आली त्यावर चेंडू अजिबात फिरकी घेत नव्हता, अशी आठवण स्मिथने काढली. अशा प्रकारच्या फसव्या खेळपट्यांवर सराव सामना खेळून वेळ वाया घालवण्यापेक्षा नेटमध्ये स्वतःचा सराव केलेला चांगला त्याद्वारे फिरकी गोलंदाजीचा अभ्यास करता येईल, असे मत स्मिथने भारत दौऱ्यासाठी प्रयाण करताना सिडनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सिडनीत फिरकी खेळपट्टीवर सराव

भारत दौऱ्यात आपल्याला कशा प्रकारच्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागणार आहे याचा अंदाज ऑस्ट्रेलियाला आहे, त्यामुळे सिडनीतील ओवल येथे काहीशा खडबडीत झालेल्या आणि भेगा पडलेल्या खेळपट्ट्यांवर आणि तोही एसजी बनावटीच्या चेंडूंनी सराव केला. भारतातील मालिकांमध्ये एसजी बनावटीचे चेंडू वापरण्यात येत असतात.

मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण भारतात दाखल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ बंगळूरमध्ये पाच दिवस फिरकी खेळपट्यांवर सराव करणार आहे. गतवेळच्या भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने पुण्यात झालेला पहिला सामना जिंकला होता मात्र त्यानंतरही त्यांनी मालिका १-२ अशी गमावली होती. २००४ पासून ऑस्ट्रेलियाने भारतात कसोटी मालिका जिंकलेली नाही. यावेळी भारत दौऱ्यावर येणारा ऑस्ट्रेलियाचा संघ चांगल्या ताकदीचा आहे.

यंदा यशस्वी व्हायचेय

गेल्या दोन दौऱ्यात मी ऑस्ट्रेलिया संघासोबत होतो पण एकदाही मालिका जिंकता आलेली नाही, असे मत व्यक्त करून स्मिथ पुढे म्हणतो, पुढील सहा महिन्यांत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे आमचे दोन मोठे प्रतिस्पर्धी असणार आहेत. ही आव्हाने मोठी असणार आहेत, परंतु त्यासाठी आम्ही तयार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT