ind vs aus test australia team problem for playing 11 in indore test david warner-pat cummins cricket news in marathi  
क्रीडा

IND vs AUS: कांगारू अडचणीत! तिसऱ्या कसोटीत कशी तयार करणार प्लेइंग-11?

ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये चिंता वाढली

Kiran Mahanavar

India vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची तिसरी कसोटी 1 मार्चपासून खेळल्या जाणार आहे. इंदूरमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना दीर्घ विश्रांती मिळाली आहे. या विश्रांतीचा फायदा घेत टीम इंडियाचे खेळाडू घरी गेले, तर ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये चिंता वाढली आहे. कारण दोन कसोटीतील पराभवानंतर कांगारू संघाचे अनेक खेळाडू मायदेशी परतत असून मालिकेतून बाहेर पडले आहेत.

तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला अनेक खेळाडूंना घरून बोलावावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रथम कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतला, त्यानंतर जोश हेझलवूड दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. आता डेव्हिड वॉर्नरही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. याशिवाय अॅश्टन एगरला ऑस्ट्रेलियाने उर्वरित मालिकेतून सोडले आहे, तो ऑस्ट्रेलियाला जाऊन देशांतर्गत स्पर्धेत भाग घेणार आहे.

याआधी मिचेल स्वीपसेनही मायदेशी परतला आहे, मात्र तो तिसऱ्या सामन्यापूर्वी परतेल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलिया संघ आपला प्लेइंग-11 कसा तयार करेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, कॅमेरूनला ऑस्ट्रेलियातून बोलावले जाऊ शकते जेणेकरून बॅकअप ओपनरची गरज भासल्यास तो ती पूर्ण करू शकेल. सध्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी इंदूर कसोटीत उस्मान ख्वाजासोबत फक्त ट्रॅव्हिस हेड सलामी करू शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच अडचणींना सुरुवात झाली, जेव्हा मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन हे फिटनेसच्या अभावामुळे नागपूर, दिल्ली कसोटीत खेळत नव्हते. दोन्ही खेळाडू इंदूर कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये निवडीसाठी उपलब्ध होऊ शकतात.

ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स, अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT