ind vs aus women odi cricket match live update score where to watch Sakal
क्रीडा

IND w vs AUS w : भारतीय महिलांसमोर आव्हान; ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दुसरा एकदिवसीय सामना

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका वाचवण्याचे आव्हान भारतीय महिलांसमोर उभे ठाकले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : कसोटी सामन्यात भले भारतीय महिला संघाने जबरदस्त विजय मिळवले असतील; पण व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा गड भेदणे आव्हानात्मकच राहिले आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका वाचवण्याचे आव्हान भारतीय महिलांसमोर उभे ठाकले आहे.

गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारूनही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिकेतील दुसरा सामना उद्या होत आहे. हा सामना जिंकून बरोबरी साधणे भारतीय संघासाठी तेवढेसे सोपे नसेल.

पहिल्या सामन्यात भारताने ८ बाद २८२ धावा केल्या होत्या; परंतु ऑस्ट्रेलियाने हे आव्हान २१ चेंडू राखूनच पार केले होते आणि त्यासाठी केवळ चारच विकेट गमावल्या. भारताने सात गोलंदाज वापरले, तरीही ऑस्ट्रेलियाचे आक्रमण रोखता आले नव्हते.

पहिल्या सामन्यात भारताने साईका इशाक आणि अमनज्योर कौर अशा दोन नव्या गोलंदाजांना संधी दिली. सोबत दीप्ती शर्मा आणि स्नेहा राणा असे अनुभवी फिरकी गोलंदाज होत्या; तरीही त्याचा फायदा झाला नाही.

कसोटी सामन्यातही त्रासदायक ठरणारी ताहिला मॅग्रा हिने पहिल्या सामन्यात नाबाद ६८ धावांची खेळी करून भारतीय गोलंदाजांवरचे आपले वर्चस्व सिद्ध केले. सोबत इलिस पेरी आणि बेथ मुनी यासुद्धा तेवढ्याच फॉर्मात आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया फलंजाजीचा शह द्यायचा असेल, तर भारतीय गोलंदाजांना वेगळीच रचना करावी लागणार आहे. सोबत क्षेत्ररक्षणाचाही दर्जा उंचवावा लागणार आहे.

भारताने भक्कम धावसंख्या उभारली असली, तरी त्यात सर्वाधिक योगदान जेमिमा रॉड्रिग्जचे (८२) होते. पूजा वस्त्रकारची आक्रमक फलंदाजीही तेवढीच मोलाची ठरली होती, कर्णधार हरमनप्रीतकडून गेल्या काही सामन्यातून मोठी खेळी साकार झालेली नाही. आता मात्र तिला आपली गुणवत्ता दाखवावीच लागणार आहे. शेफाली वर्माचीही कामगिरी तळ्यात-मळ्यात अशीच आहे. तिच्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

आपल्या कल्पक मार्गदर्शनाच्या जोरावर अगोदर इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे कसोटी सामने जिंकून देण्यात निर्णायक कामगिरी बजावणारे प्रशिक्षक अमोल मुझुमदार पुढच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी कशी रणनीती तयार करतात, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT