Ind vs Aus World Cup 2023 Rohit Sharma sakal
क्रीडा

Ind vs Aus : 'सुरुवातीला मी नर्व्हस होतो...' ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात रोहित शर्माला कशाची वाटत होती भीती?

Kiran Mahanavar

Ind vs Aus World Cup 2023 Rohit Sharma : वर्ल्डकप 2023 ची सुरुवात भारताने विजयाने केली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खरंच खूप खराब झाली होती. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे तिन्ही फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले.

भारताच्या डोक्यावर पराभवाची टांगती तलवार होती पण विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. सामन्यानंतर रोहित शर्मानेही सांगितले की सुरुवातीला तो नर्व्हस होतो.

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, मला जिंकल्यानंतर बरे वाटले. कारण स्पर्धेत चांगली सुरुवात करणे आमच्यासाठी महत्वाचे होत. या सामन्यात प्रत्येक खेळाडूने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. यासोबत आमच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला वापर केला. वेगवान गोलंदाजांनाही रिव्हर्स स्विंग मिळाले, फिरकी गोलंदाजांनी चांगल्या भागात गोलंदाजी केली. एकूणच हा एक उत्तम सामना होता.

कर्णधार रोहित पुढे म्हणाला की, मी सुरुवातीला नर्व्हस होतो. कारण तुम्हाला अशी इनिंगची सुरूवात कधीच करायची नव्हती. याचे संपूर्ण श्रेय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जाते कारण त्यांनी योगे जागेवर गोलंदाजी केली आणि आम्हीही खराब शॉट्स खेळले. तुमच्याकडे लक्ष्य असेल तेव्हा तुम्हाला माहिती पॉवरप्लेमध्ये किती धावा करायची आहेत. त्याचे श्रेय विराट कोहली आणि केएल राहुल यांना जाते, कारण त्यांनी संयम ठेवून लक्ष्याचा पाठलाग केला. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जाणे आणि जुळवून घेणे, जो परिस्थितीशी जुळवून घेईल त्याला येऊन काम करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT