Ind vs Aus WTC Final 2023 
क्रीडा

Ind vs Aus : चॅम्पियन होण्यासाठी टीम इंडियाला 540 चेंडूत 280 धावांची गरज! माजी कर्णधार अन् उप-कर्णधारवर भारताची मदार

सुनंदन लेले

Ind vs Aus WTC Final 2023 : भारताचा विजय, पराभव की अनिर्णित असे तिन्ही पर्याय खुले असलेला जागतिक कसोटी अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. आव्हानांचा डोंगर मोठा आहे. चौथ्या दिवस अखेर ३ बाद १६४ अशी मजल मारली. आज ९० षटकांत २८० धावा हव्या आहेत पण विकेट सातच शिल्लक आहेत. मात्र नाबाद असलेल्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर भारतीयांची मदार आहे.

ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित करून भारताला विजयासाठी ४४४ धावांचे आव्हान दिले, परंतु ते स्वीकारणाऱ्या रोहित शर्माच्या टीमने वेगवान सुरवात करत १ बाद ९२ अशी मजलही मारली, परंतु रोहित आणि चेतेश्वर पुजारा सहा चेंडूंच्या फरकाने बाद झाले.

दडपण अधिकच वाढले असताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद ७१ धावांची भागीदारी करुन किल्ला लढवत ठेवला आहे. ४४४ धावांचा पाठलाग करायचे ध्येय खरंच खूप लांब वाटत होते. आधुनिक जमान्यातील खेळाडू मनाने कणखर असल्याचे उदाहरण लगेच अनुभवायला मिळाले.

एव्हढे मोठे दडपण असून शुभमन गिल आणि रोहित शर्माने कचखाऊ पवित्रा घेतला नाही. वेगवान माऱ्‍याला संभ्रमात ठेवायचा पक्का विचार दोघा सलामीच्या फलंदाजांनी केलेला बघायला मिळाला. खराब चेंडूवर चौकार आणि चांगल्या चेंडूला मोकळ्या जागेत ढकलून दोघांनी धावा जमा करायचा सपाटा लावला होता.

त्या अगोदर शुभमन गिलचा कॅमेरून ग्रीनने पकडलेला झेल सर्वात वादग्रस्त ठरला. टिव्ही रिल्पेमध्ये ग्रीनच्या दोन बोटांमधला चेंडू जमिनीला लागल्याचे दिसत असतानाही तिसऱ्या पंचांनी गिलला बाद दिले.

तत्पूर्वी, चौथ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यावर लगेच उमेश यादवने चिवड लबुशेनला बाद केले आणि भारतीय प्रेक्षकांनी उत्साहाने गलका केला. दुसऱ्‍या डावात गोलंदाज काही चमत्कार करणार का, या आशेने प्रेक्षक सरसावून बसले. कॅमरुन ग्रीनला जडेजाने बाद केल्यावर अपेक्षा वाढल्या.

अलेक्स केरीने मिचेल स्टार्कसह भागीदारी रचून आशा फोल ठरवल्या. दडपणाचा बोजा मनावर नसल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज दुसऱ्‍या डावात सहजी फलंदाजी करत होते. दुसरा नवा चेंडू घेतल्याचा फायदा भारतापेक्षा समोरच्या फलंदाजांना जास्त झाला. केरी आणि स्टार्कने झटपट धावा जमा करून आघाडी चारशेच्या पार नेली. मिचेल स्टार्क आणि कप्तान पॅट कमिन्स बाद झाल्यावर डाव घोषित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT