ind vs aus wtc-final-qualification-scenario-what-happens-if-india-fails-to-win-4th-test-sl-beat-new-zealand-in-1st-test cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS: अहमदाबाद कसोटी ड्रॉ झाली तर भारत बाहेर? वाचा काय आहे WTC FINAL चे समीकरण

Kiran Mahanavar

WTC Final Qualification Scenario : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्याच्या कसोटी मालिकेतील पहिले तीन सामने तीन दिवसात संपले आहेत. भारताने पहिले दोन सामने जिंकले होते तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात आतापर्यंत फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, तर भारतीय संघानेही तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रश्न पडतो की हा सामना अनिर्णित राहिला किंवा टीम इंडिया हरली तर काय होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामना जर अनिर्णित राहिला किंवा भारतीय संघ हरला, तर सर्व लक्ष न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेकडे वळले जाईल. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथे खेळल्या जात आहे. या सामन्यात पाहुण्यांनी किवी संघासमोर विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. नऊ धावसंख्येवर संघाला पहिला धक्का बसला. त्यामुळे कुठेतरी भारताच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

  • अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे.

  • भारत दुसऱ्या क्रमांकावर तर श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  • श्रीलंकेने दोन्ही कसोटी सामने जिंकल्यास ते अंतिम फेरीत पोहोचेल.

  • एकही सामना अनिर्णित राहिला किंवा श्रीलंका एकही हरला तरी टीम इंडिया WTC फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करेल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळल्या जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Ballari Jail : 'या' अभिनेत्याने रडत रडत न्यायाधीशांकडे कारागृहात केली विष देण्याची विनंती; असं काय घडलं त्याच्यासोबत?

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Chhagan Bhujbal : ‘कुणबी’चा आदेश मागे घ्यावा; ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू नका

मोहोळ तालुका हादरला! गलंदवाडी येथील दांपत्यास कोयत्याने मारहाण करून दरोडा; दोघेजण जखमी, जीवे मारण्याची धमकी अन्..

SCROLL FOR NEXT