wtc final-sanjay-bangar-including-r ashwin-in-the-playing-xi-instead-of-ravindra jadeja-and-axar patel-team india cricket news in marathi kgm00
wtc final-sanjay-bangar-including-r ashwin-in-the-playing-xi-instead-of-ravindra jadeja-and-axar patel-team india cricket news in marathi kgm00 SAKAL
क्रीडा

IND vs AUS: कोचने जडेजाला अन् अक्षरला WTC फायनलमधून वगळले, 3 महिने आधीच सांगितली प्लेइंग-11

Kiran Mahanavar

Ind vs Aus WTC Final : टीम इंडियाने थाटात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक एन्ट्री केली आहे. आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. त्याचवेळी न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव करत भारताला फायनल मध्ये पोहोचले.

चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळल्या जाणार आहे. जून महिन्यात इथे खूप थंडी असते. फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी अंतिम सामन्यासाठी रवींद्र जडेजा ते अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजाने 22 विकेट घेतल्या तर अक्षरने 3 अर्धशतकांच्या मदतीने 264 धावा केल्या होत्या. संघाकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही तो दुसऱ्या स्थानावर होता.

स्टार स्पोर्ट्सवरील समालोचन दरम्यान संजय बांगर म्हणाले की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने 4 वेगवान गोलंदाजांसह जावे. यामध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजचे स्थान निश्चित आहे. दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

दुसरीकडे, उमेश यादवने संधी मिळताच नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करावा. तो वेगवान गोलंदाजीही करतो. शार्दुलने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटीत चांगली कामगिरी केली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर म्हणाले की, आर अश्विन हवेत चेंडू टाकून फलंदाजांना अधिक त्रास देतो. तर रवींद्र जडेजा रफ जास्त वापरतो. अशा परिस्थितीत मी आर अश्विनला अंतिम फेरीत संधी देऊ इच्छितो. सलामीच्या जोडीबाबत तो म्हणाला की, यासाठी सध्याच्या फॉर्मला प्राधान्य दिले जाते. अशा स्थितीत रोहित शर्मा आणि शुभमन गिल हेच फायनलमध्ये ओपनिंग करताना दिसणार आहेत. चेतेश्वर पुजारा नंबर-3 आणि विराट कोहली नंबर-4 वर खेळेल.

संजय बांगर पुढे म्हणाले की, श्रेयस अय्यर अजूनही जखमी आहे. अशा स्थितीत क्रमांक-5 ची जागा अद्यापही रिक्त आहे. सूर्यकुमार यादवपासून ते केएल राहुलपर्यंत या शर्यतीत आहेत. सरफराज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे. केएस भरत अंतिम फेरीत यष्टिरक्षक म्हणून खेळू शकतो.

टीम इंडिया बऱ्याच दिवसांपासून आयसीसी ट्रॉफीची वाट पाहत आहे. भारताने शेवटचे 2013 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT