India vs Bangladesh Score 1st Test Day 5 sakal
क्रीडा

IND vs BAN 1st Test: भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी

Kiran Mahanavar

India vs Bangladesh Score 1st Test Day 5 : भारताने बांगलादेश विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 188 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनी अप्रतिम कामगिरी केली. या मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

कुलदीप यादवने बांगलादेशला नववा धक्का

कुलदीप यादवने बांगलादेशला नववा धक्का दिला आहे. त्याने इबादत हसनला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. इबादतने पाच चेंडूंचा सामना केला मात्र त्याला खाते उघडता आले नाही. कुलदीप यादवचे या डावातील हे तिसरे यश आहे.

बांगलादेशची आठवी विकेट पडली

बांगलादेशचे आठ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. शाकिब अल हसनच्या रूपाने बांगलादेशला आठवा धक्का बसला. शाकिबने 108 चेंडूत 84 धावा केल्या. त्याच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता.

भारत विजयाच्या जवळ; बांगलादेशला सातवा धक्का!

बांगलादेशची सातवी विकेट पडली आहे. मोहम्मद सिराजने मेहदी हसनला बाद करून टीम इंडियाला सातवे यश मिळवून दिले आहे. उमेश यादवने त्याचा झेल टिपला.

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू

चितगाव कसोटीत पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. मोहम्मद सिराजने दिवसाचे पहिले षटक टाकले ज्यात पाच धावा झाल्या. बांगलादेशची धावसंख्या सध्या सहा विकेट्सवर 277 धावा आहे. शाकिब अल हसन 41 आणि मेहदी हसन मिराज 13 धावांवर खेळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT