ind vs ban bcci call for review meeting after team india defeat in odi series against bangladesh rohit sharma  sakal
क्रीडा

IND vs BAN : लाजिरवाणा पराभव! BCCI ने भारतीय संघाला फटकारलं

आता कोणाची होणार हकालपट्टी! मालिका पराभवानंतर BCCIने बोलावली बैठक

Kiran Mahanavar

IND vs BAN BCCI Review Meeting : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळल्या गेला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

बांगलादेश दौऱ्यावर रोहित आणि ब्रिगेडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. आता या पराभवानंतर मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेश दौऱ्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आढावा बैठकीसाठी बोलावले आहे.

इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा पराभव आत्मसात खूप कठीण आहे. बांगलादेश मालिकेनंतर लगेचच आम्ही प्रलंबित आढावा बैठक घेणार आहोत. भारताच्या खराब कामगिरीमुळे बोर्ड अचंबित झाला आहे. त्याचबरोबर संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंचे वाढते प्रमाणही बोर्डासाठी चिंतेचा विषय आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने बांगलादेश दौऱ्यानंतर मुंबईत संघाची आढावा बैठक बोलावली आहे.

बांगलादेशने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 271/7 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात भारत 266/9 धावाच करू शकला. सलग दोन सामने गमावण्याबरोबरच भारताने मालिकाही गमावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Sangli Election : एकाच प्रभागात अनेक दावे, अनेक गट, भाजपची अंतर्गत फूट, राष्ट्रवादीची जातीय मांडणी; प्रभाग आठ बनला रणांगण

Mumbai - Goa Highway : कोकणाच्या विकासाचा कणा अजूनही खड्ड्यातच; मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा अंत न दिसणारा प्रवास

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेत प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रिलॅक्स झोन’ची सुरूवात

SCROLL FOR NEXT