IND vs BAN Dinesh Karthik Run Out ICC Rules  sakal
क्रीडा

Dinesh Karthik : कार्तिकच्या रनआउटवरून गोंधळ, ICC चा नियम काय सांगतो?

दिनेश कार्तिकला चुकीच्या पद्धतीने आऊट देण्यात आले? ट्विटरवर प्रचंड गदारोळ

Kiran Mahanavar

IND vs BAN Dinesh Karthik Run Out : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर-12 फेरीचा महत्त्वपूर्ण सामना खेळला गेला. टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे पाच धावांनी सामना जिंकला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 185 धावा करायच्या होत्या, मात्र पावसामुळे त्यांना 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. 16 षटकांत सहा विकेट्सवर केवळ 145 धावाच करता आल्या.

भारताने पुन्हा एकदा दिनेश कार्तिकला संधी दिली. बांगलादेशविरुद्ध कार्तिक पाच चेंडूंत सात धावा करून धावबाद झाला. खरे तर दिनेश कार्तिकला शरीफुल इस्लामने बाद केले तेव्हा त्याच्या हातात चेंडू नव्हता. चेंडूशिवाय स्टंप उखडूनही दिनेश कार्तिकला आऊट देण्यात आले आणि हे अनेकांना समजले नाही. दिनेश कार्तिकला चुकीच्या पद्धतीने आऊट देण्यात आले. यावरून ट्विटरवर प्रचंड गदारोळ सूरू झाला. आयसीसीचे नियम काय सांगतो समजून घेऊ.

विराट कोहलीने एक्स्ट्रा कव्हरमध्ये सरळ शॉट मारला. दिनेश कार्तिक धाव घेण्यासाठी पळाला होता. शाकिब अल हसनने चेंडू पकडून थेट गोलंदाजाच्या हातात फेकला. कार्तिक क्रीझच्या बाहेर होता आणि गोलंदाजाचा हात स्टंपला लागला. आयसीसीच्या नियमांनुसार, जर चेंडू स्टंपला लागला आणि त्यानंतर शरीराच्या भागातून बेल्स पडले तर फलंदाजाला आऊट दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT