Virat-Kohli-Joe-Root 
क्रीडा

IND vs ENG: विराट कोहली, जो रूट दोघांनाही बसला दंड; कारण...

IND vs ENG: विराट कोहली, जो रूट दोघांनाही बसला दंड; कारण... पहिल्या टेस्ट मॅचमध्ये घडली 'ती' घटना Ind vs Eng 1st Test England Team India penalized for slow over rate by ICC vjb 91

विराज भागवत

Ind vs Eng 1st Test: टीम इंडिया आणि इंग्लंड (Ind vs Eng 1st Test) यांच्यातील पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. इंग्लंडने दुसऱ्या डावात केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे सामन्यात रंगत आली होती. पण पावसाने (Rain Stopped Play) रंगाचा बेरंग केला. पाचव्या दिवसाचा खेळ होऊच शकला नाही आणि सामना अनिर्णित (Match Drawn) राहिला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने पहिल्या डावाता अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक ठोकले. विराटला मात्र एकमेव डावात शून्यावर बाद व्हावे लागले. असे असताना दोन्ही कर्णधारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ या स्पर्धेत पहिलाच सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना २-२ गुण मिळाले, पण चार दिवसांचा जो खेळ झाला त्यात या दोघांना एका गोष्टीसाठी दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. कसोटी क्रिकेटमध्ये षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी या दोघांनाही दंड ठोठवण्यात आला. दोन्ही संघांना सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के मानधन दंड म्हणून भरण्याचे आदेश सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दिले. चार दिवस झालेल्या खेळात दोन्ही संघांकडून नियमापेक्षा कमी षटके टाकली गेली. त्यामुळे दोनही कर्णधारांना त्याचा फटका बसला.

IND vs ENG

असा रंगला चार दिवसांचा खेळ

पहिल्या चार दिवसांच्या खेळात इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर तर भारताचा पहिला डाव २७८ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगला कमबॅक केला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचे शतक (१०९), जॉनी बेअरस्टो (३०) आणि सॅम करन (३२) या तिघांनी संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. त्यामुळे भारताला विजयासाठी २०९ धावांचे आव्हान मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताकडून पहिल्या डावात दमदार ८२ धावा करणारा राहुल स्वस्तात बाद झाला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी प्रत्येकी १२ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT