ind vs aus test Sarfaraz Khan sakal
क्रीडा

IND vs ENG: BCCI ची मोठी घोषणा! सर्फराज खानसह 'या' दोन खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री

India vs England 2nd Test News 2024 :

Kiran Mahanavar

IND vs ENG 2nd Test 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, मालिकेतील पुढील सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने यांची घोषणा केली आहे. संघात 3 युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हे तिन्ही खेळाडू कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या संघाचा भाग असतील.

भारतीय निवड समितीने मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात समावेश केला आहे. दुसरीकडे, आवेश खान त्यांच्या रणजी संघासोबत खेळत आहे, पण गरज पडल्यास तो कसोटी संघात सामील होईल.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतरही 28 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 100 धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर कसोटी सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, अवेश खान, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT