क्रीडा

IND vs ENG: अरेरे... इतिहासात इंग्लंडवर प्रथमच आली अशी वेळ!

विराज भागवत

इंग्लंडच्या बाबतीत असं याआधी कधीच घडलं नव्हतं

Ind vs Eng 2nd Test Day 5: मोहम्मह शमीचे दमदार अर्धशतक (५६*) आणि त्याला जसप्रीत बुमराहने (३४*) दिलेली साथ याच्या बळावर भारताने इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. याचसोबत इंग्लंडच्या बाबतीत क्रिकेटच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली.

भारताच्या जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीने रॉरी बर्न्सला शून्यावर माघारी पाठवले. पाठोपाठ मोहम्मद शमीने आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर डॉम सिबलीलाही शून्यावर माघारी धाडले. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर भारताविरूद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. या आधी सलामीवीरांपैकी एक जण शून्यावर बाद झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. पण दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद होण्याची नामुष्की इंग्लंडवर पहिल्यांदाच ओढवली.

असा रंगला भारताचा दुसरा डाव

भारताचा पहिला डाव ३६४ वर तर इंग्लंडचा ३९१ वर आटोपल्याने यजमानांना २७ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताकडून लोकेश राहुल (५) रोहित शर्मा (२१) आणि विराट कोहली (२०) लवकर बाद झाले. रहाणे-पुजारा जोडीने डाव सावरला. पुजाराने २०९ चेंडूत ४५ तर अजिंक्यने १४६ चेंडूत ६१ धावा केल्या. त्यानंतर जाडेजा (४), ऋषभ पंत (२२) आणि इशांत शर्मा (९) हे स्वस्तात बाद झाले. पण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी सामन्याचा नूरच बदलला. शमीचे दमदार अर्धशतक (५६*) आणि बुमराहची त्याला लाभलेली साथ (३४*) यामुळे भारताने ८ बाद २९८ धावांपर्यंत मजल मारली आणि डाव घोषित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT