क्रीडा

IND vs ENG: बुमराह-शमीचा 'डबल धमाका'; केले दोन दमदार विक्रम!

IND vs ENG: बुमराह-शमीचा 'डबल धमाका'; केले दोन दमदार विक्रम! ९व्या आणि १०व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं Ind vs Eng 2nd Test Day 5 Live Mohd Shami Jasprit Bumrah put 50 runs partnership for 9th wickets 2 records on their name vjb 91

विराज भागवत

९व्या आणि १०व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं

Ind vs Eng 2nd Test Day 5: इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताची वरची फळी पूर्णपणे अपयशी ठरली. पण मधल्या फळीत पुजारा आणि रहाणेने संयमी भागीदारी करून संघाच्या आशा पल्लवित केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर बाकी कोणाला फारशी छाप पाडता आली नाही, पण भारताच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने चक्क ५० धावांची भागीदारी केली. बाऊन्सर गोलंदाजीचा सामना करत या दोघांनी संघर्षपूर्ण फलंदाजी केली आणि दोन दमदार विक्रम आपल्या नावे केले.

१९८२ नंतर पहिल्यांदाच अर्धशतकी भागीदारी

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. १९८२ नंतर पहिल्यांदा ९व्या विकेटसाठी भारताच्या फलंदाजांनी ५० धावांची भागीदारी केली. १९८२मध्ये कपिल देव आणि मदनलाल यांनी ६६ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर आज भारताकडून नवव्या विकेटसाठी पहिल्यांदा अशी कामगिरी करण्यात आली. शमी आणि बुमराह यांनी केलेली भागीदारी ही ६६ धावांपेक्षाही पुढे गेल्याने ही नवव्या विकेटसाठी भारताने केलेली गेल्या ३० वर्षातील सर्वोच्च भागीदारी ठरली.

२००७ नंतर पहिल्यांदाच 'सेना' देशांत अशी कामगिरी

गेल्या १३ वर्षात पहिल्यांदाच SENA देशांमध्ये म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमध्ये भारतीय फलंदाजांनी नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला. या आधी २००७ साली व्हीव्हीएस लक्ष्मण आणि आरपी सिंग या दोन खेळाडूंनी नवव्या विकेटसाठी पर्थच्या मैदानावर अर्धशतकी भागीदारी केली होती. त्यानंतर प्रथमच बुमराह-शमी जोडीने ही कामगिरी करून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT