Siraj-Clean-Bowled 
क्रीडा

Video: सिराजने पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा; फलंदाजही हैराण

Video: सिराजने पहिल्याच चेंडूवर उडवला इंग्लंडच्या हमीदचा त्रिफळा टप्पा पडल्यावर चेंडू पटकन स्विंग झाला अन्... Ind vs Eng 2nd Test Lords Video Swing Bowler Mohd Siraj Clean Bowled Haseeb Hameed first Bowl batsman amazed watch vjb 91

विराज भागवत

Ind vs Eng 2nd Test Lords: भारतीय संघाचा पहिला डाव ३६४ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसरे सत्र संपेपर्यंत इंग्लंडने चांगली फलंदाजी केली. तिसऱ्या सत्रात मात्र सिराजने दोन चेंडूत दोन बळी घेतले. बर्न्ससोबत २३ धावांची भागीदारी झाल्यानंतर सिबली बाद झाला. सिराजने त्याला माघारी धाडले. त्यानंतर खूप दिवसांची संधी मिळालेला हसीब हमीद ज्या पद्धतीने बाद झाला, त्याची खूपच चर्चा झाली.

हसीब हमीदला खूप दिवसांनी संधी मिळाली होती. त्यामुळे तो दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती पण त्याला चेंडूच समजू शकला नाही. सिराजने गुड लेंग्थवर चेंडू टाकला. तो चेंडू खेळण्यासाठी त्याने हळूवार पाय पुढे काढला पण त्याला चेंडू कळायच्या आतच तो क्लिन बोल्ड झाला. आपण कसे बोल्ड झालो हेदेखील हमीदला कळलं नाही.

पाहा व्हिडीओ-

'टीम इंडिया'चा पहिला डाव-

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल दोघांनी दमदार कामगिरी केली. या दोघांनी दमदार शतकी सलामी दिली. पण रोहितला शतक झळकवता आले नाही. रोहित ८३ धावा काढून माघारी परतला. चेतेश्वर पुजारादेखील ९ धावा काढून माघारी परतला. कर्णधार विराटने चांगली सुरूवात केली, पण तोदेखील ४२ धावांवर बाद झाला. राहुलने मात्र एक बाजू लावून धरली आणि १२९ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशीच्या खेळात सुरूवातीला राहुल बाद झाला मग पाठोपाठ अजिंक्य रहाणे (१), ऋषभ पंत (३७), मोहम्मद शमी (०), इशांत शर्मा (८) आणि जसप्रीत बुमराह (०) लगेच माघारी परतला. अशा वेळी धावा जमवण्याच्या उद्देशाने जाडेजाने फटका खेळला आणि तो ४० धावांवर बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT